घरदेश-विदेशकर्नाटकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाची मोठी कारवाई

कर्नाटकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाची मोठी कारवाई

Subscribe

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कर्नाटकात एका सत्ताधारी भाजप आमदाराकडे आयकर विभागाला कोट्यवधींची रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्षांकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. अनेक अपक्ष उमेदवार देखील यंदाच्या वर्षी आपले नशीब आजमावणार आहेत. पण कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कर्नाटकात एका सत्ताधारी भाजप आमदाराकडे आयकर विभागाला कोट्यवधींची रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस यंत्रणा आणि आयकर विभागाच्या सर्तकतेमुळे पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्याचे सांगण्यात आले आहे.

कर्नाटकातील रामदुर्ग मतदारसंघातील भाजपचे आमदार चिक्करेवन्ना यांनाच भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधीत असलेल्या गाडीमध्ये रोकड असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १ कोटी ५४ लाखांची रोकड सापडली. ही रोकड पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधीत असलेल्या गाडीमध्ये ही अनधिकृत कोट्यवधींची रक्कम सापडल्याने आयकर विभागाकडून देखील या प्रकरणी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

- Advertisement -

चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधीत असलेल्या गाडीमध्ये ही रक्कम कुठून आली? आणि ही रक्कम कोणत्या गोष्टीसाठी वापरण्यात येणार होती. हा कोणाचा काळा पैसा आहे का? अशा एक ना अनेक बाबींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आमदाराकडेच कोट्यवधींची रोकड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

येत्या मे महिन्यामध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून राज्यातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारे कारवाई करण्यात येत आहे. या कारवायांमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रक्कम देखील सापडत आहेत. तसेच, याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक देखील काढले होते. या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ आठ दिवसांत 69.36 कोटी रुपये, दारू आणि इतर साहित्य जप्त केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऐन उकाड्यात पुण्यात पावसाला सुरुवात; विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पडल्या गारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -