घरमहाराष्ट्रपुणेऐन उकाड्यात पुण्यात पावसाला सुरुवात; विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पडल्या गारा

ऐन उकाड्यात पुण्यात पावसाला सुरुवात; विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पडल्या गारा

Subscribe

दुपारी आकाश निरभ्र होतं अन‌् उन्हाचा कडाका प्रचंड होता. परंतू साडेतीन वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले आणि सगळीकडे ढगाळ वातावरण झालं.

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पारा कमालीचा वाढला असून, अनेक शहरांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. घराबाहेर पडल्यानंतर लोकांना उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत असून काही मिनिटांतच शरीर घामांनी चिंब भिजत आहे. पण पुण्यात मात्र सध्या कुठे पाऊस तर कुठे गारा असं विचित्र वातावरण झालंय. त्यामुळे उकाड्यात घामाने भिजलेले पुणेकर अचानक आलेल्या पावसाने भिजून गेले आहेत.

दुपारच्या कडाक्याचा उष्णतेच्या लाटेने हैराण झालेले पुणेकर अचानक आलेल्या पावसाने काहीसे सुखावले आहेत. पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. कोथरूड, वारजे, शिवाजीनगर आणि नवी पेठ परिसरात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. सिंहगड परिसरात तर गारांचा पाऊस सुरू झालाय.

- Advertisement -

दुपारी आकाश निरभ्र होतं अन‌् उन्हाचा कडाका प्रचंड होता. परंतू साडेतीन वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले आणि सगळीकडे ढगाळ वातावरण झालं. हळुहळू पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या आणि काही वेळाने तर गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. हा अवकाळी पाऊस असला तरी उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना या अवकाळीने थोडासा गारवा अनुभवता आला.

पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तपामानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगावशेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरंतर कोरेगावपार्कला झाडी माेठ्या प्रमाणावर आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -