घरताज्या घडामोडीBird Flu Outbreak: केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रकोप, बदके आणि कोंबड्यांना मारण्याचे आदेश

Bird Flu Outbreak: केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रकोप, बदके आणि कोंबड्यांना मारण्याचे आदेश

Subscribe

केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रकोप झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आता बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. केरळमधील थाकाझी पंचायतमधून बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लूचं संक्रमण असल्याचं सांगितलं जात आहे. येथील अधिकाऱ्यांनी प्रभावीत क्षेत्रातील काही भागांमध्ये एक किलोमीटर पर्यंत असणाऱ्या परिसरात बदके, कोंबडी आणि घरातील पक्ष्यांना मारण्याचा आदेश देण्यात आला आहे.

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी ए. अलेक्झांडर यांनी गुरुवारी पशुसंवर्धन, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर येथील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितला. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने थाकाझी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १०च्या एक किलोमीटरच्या परिसरात सर्व बदके, कोंबडी आणि इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिसरात वाढणार संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते. असं अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर सांगितलं.

- Advertisement -

ज्या परिसरात बर्ड फ्लूची साथ परसली आहे. त्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लोकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू असलेल्या भागात कोंबडी, बदके, पक्ष्यांची अंडी आणि मांस इत्यादींच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हा विषाणू हवेत वेगाने पसरतो आणि बहुतेक पक्ष्यांना संक्रमित करतो. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात जवळपास ४८ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामु्ळे त्यांच्यामध्ये H5N8 विषाणू आढळून आला आहे. याशिवाय राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एका तलावात बर्ड फ्लूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या जिल्ह्यामध्ये पाच दिवसांत ६० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे केरळमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. अल्लापुझा जिल्ह्यातील ठक्काजी पंचायतच्या कुट्टनाड परिसरात एका शेतकऱ्याच्या हजार बदकांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात २०२१ च्या सुरूवातीला बर्ड फ्लूची साथ आली होती. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे.


हेही वाचा : कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार, जयंत पाटील यांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -