घरदेश-विदेशBJP & Congress : काँग्रेसने 'या' घडामोडींकडे डोळसपणे पाहण्याची गरज, ठाकरे गटाचा...

BJP & Congress : काँग्रेसने ‘या’ घडामोडींकडे डोळसपणे पाहण्याची गरज, ठाकरे गटाचा सल्ला

Subscribe

मुंबई : भाजपाने छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्रीपदी नेमले. मध्य प्रदेशात बिनचेहऱ्याचे कोणी मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे नियुक्तीपत्र दिले. तर, राजस्थानात वसुंधराराजे यांनाही दूर करून प्रथमच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. तिन्ही नव्या मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे, पण शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे हेही संघ परिवाराचेच घटक होते. तरीही त्यांना विचारात घेतले नाही. आम्ही तळागाळातील बिनचेहऱ्याच्या कार्यकर्त्यांस उच्च पद देतो हाच त्यातला संदेश आहे. काँग्रेसने या घडामोडींकडे डोळसपणे पाहायला हवे, असा सल्ला ठाकरे गटाने दिला आहे.

हेही वाचा – BJP’s CM : भाजपाचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र हेच…, ठाकरे गटाची खोचक टिप्पणी

- Advertisement -

राज्याराज्यांतील वतनदार, सुभेदारांना हात लावण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. मध्य प्रदेशातील निवडणूक पूर्णपणे कमलनाथ यांच्या भरवशावर होती. ते सांगतील ते धोरण आणि ते ठरवतील ते उमेदवार असेच चित्र होते. राजस्थानात गेहलोत हे निवडणूक एका त्वेषाने लढले, पण तरुण सचिन पायलट यांना नेतृत्व दिले असते तर, कदाचित निकालात बदल दिसला असता. नेतृत्व बदलाचे धाडस काँग्रेस दाखवू शकली नाही. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल हे ‘आपण जिंकलोच आहोत’ अशा वावटळीवर स्वार होते आणि त्यातून धक्कादायक निकालांना सामोरे जावे लागले, असे स्पष्ट मत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून मांडले आहे.

अर्थात, भाजपाची सध्याची स्थिती व काँग्रेसची परिस्थिती यात फरक आहे. काँग्रेस जेव्हा अजिंक्य आणि मजबूत स्थितीत होती तेव्हा, दिल्लीश्वर राज्यातील मुख्यमंत्र्यांना हवे तसे बदलीत असत. आमदारांतून नेता निवडण्याऐवजी दिल्लीतून मुख्यमंत्री नेमले जात होते. आज काँग्रेस असे करण्याच्या स्थितीत नाही. गांधी परिवाराने त्यांच्या भरभराटीच्या काळात भल्याभल्यांना ‘सरळ’ करून घरी बसवले आहे, याकडेही ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्या; आशिष शेलार यांची मागणी

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडपेक्षा वेगळे निकाल तेलंगणात लागले. बलाढ्य के. चंद्रशेखर राव यांचा पराभव काँग्रेसने केला. कारण मुख्यमंत्रीपदासाठी कोणताच प्रस्थापित चेहरा तेथे नव्हता आणि निकाल लागताच तरुण, लढाऊ रेवंत अण्णा रेड्डी यांना मुख्यमंत्री नेमले. रेवंत अण्णा यांनाही चेहरा केले नव्हते आणि सामान्य परिस्थितीतून ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रेवंत अण्णा, विष्णुदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा यांना सारखेच गुण द्यावे लागतील, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – OBC साठी आनंदाची बातमी : शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 60 हजार रुपये मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -