घरमहाराष्ट्रAjit Pawar : “पीएचडी करून काय दिवे लावणार?”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar : “पीएचडी करून काय दिवे लावणार?”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल

Subscribe

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. विविध विषयांवर सभागृहात चर्चा होते. विधेयकं, प्रस्ताव मांडे जातात. अशाचत PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केलं आहे.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना प्रश्न विचारले. फेलोशिपसाठी 29 मार्चला जाहीरात प्रसिद्ध केली. त्यात कोणतीही अट नव्हती. त्यानंतर सहा महिन्याने 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची अट टाकली. त्याआधी 1300 विद्यार्थ्यांनी फोलोशिपसाठी अर्ज केले. फेलोशिप मिळेल, अशी त्या विद्यार्थ्यांना आशा होती. त्यामुळे 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची अट आपण पुढच्या वर्षांपासून लागू करावी अशी विनंती आहे. असं सतेज पाटील म्हणाले. त्यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले की, फेलोशिप घेऊन काय करणार? काय दिवे लावणार आहेत? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा… Patole Vs Pawar : अजित पवारांना सत्तेचा माज; नाना पटोले यांची टीका

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसेने (MNS) आपल्या सोशल मिडीयावरी एक्सवर( ट्विटर ) पोस्ट करत खेदजनक आणि तितकंच संपापजनक असल्याचं म्हटलं आहे.

मनसेच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत त्यामध्ये लिहण्यात आलं आहे की, जाहिरातबाजी, मंत्र्यांची आलिशान दालनं, गाड्या, बंगले ह्यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो मात्र सारथी, महाज्योती, बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील तर उप-उपमुख्यमंत्री म्हणणार ‘पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?”

- Advertisement -

#खेदजनक आणि तितकंच #संतापजनक !

या पोस्टमध्ये मनसेनं म्हटलं आहे की, “जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करताना, मंत्र्यांच्या दालनावर शेकडो कोटी रुपये खर्च करताना सरकारला निधीचा अपव्यय वाटत नाही. पण बहुजन समाजातील मुलांनी उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागितली तर तो खर्च मात्र नकोसा का वाटतो?” असा सवाल मनसेच्या (MNS) सोशल मीडिया पोस्टद्वारे विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -