घरदेश-विदेशयेडियुरप्पा झाले कर्नाटकचे मुख्यमंत्री

येडियुरप्पा झाले कर्नाटकचे मुख्यमंत्री

Subscribe

आज सकाळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाला आज पूर्णविराम मिळाला. कर्नाटकात आपले निशाण फडकविण्यात भाजपला पुन्हा यश आले आहे. त्यानुसार आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानुसार बी. एस. येडियुरप्पा हे चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा

पण भाजपने अद्याप बहुमत सिद्ध न केल्याने ते सिद्ध केल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. त्यासाठी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान जेडीएस आणि काँग्रेसच्या १३ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला. परिणामी कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. परिस्थितीचा फायदा उचलत भाजपने विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली. मात्र, विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात कुमारस्वामी सरकार अपयशी ठरले. परिणामी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या दरम्यान कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले. लागलीच भाजपनेसुद्धा हालचाली सुरु करुन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानुसार आज सकाळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी दिली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी

बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची शक्यता

त्यानुसार आज येडियुरप्पा यांनी शपथ घेतली. मात्र विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतरच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा अन्य आमदारांना मंत्रिपदाची नावे जाहीर करतील. १३ बंडखोर आमदारांना येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी भाजपचे विद्यमान आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी कर्नाटकातील राजकारण तप्तच राहण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -