घरताज्या घडामोडीBomb Threat: बंगळुरूमधील पाच शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, शोध मोहीम सुरू

Bomb Threat: बंगळुरूमधील पाच शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, शोध मोहीम सुरू

Subscribe

बंगळुरूमधील पाच शाळांना बॉम्बची धमकी देणारे ई-मेल आले आहे. अशा प्रकारच्या ई-मेलमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या पाचही शाळांमध्ये सध्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा ई-मेल रात्री ११ वाजता आला. परंतु हा मेल मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शोध मोहीम देखील सुरू आहे.

या शाळांना मिळाल्या धमक्या –

डीपीएस वरथूर
गोपालन इंटरनॅशनल स्कूल
निव अकादमी स्कूल
सेंट. व्हिन्सेंट पॉल शाळा
इंडियन पब्लिक स्कूल गोविंदपुरा

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना धमकी देणारे ईमेल शुक्रवारी सकाळी १०.१५ ते ११ च्या सुमारास पाठवण्यात आले होते. वेगवेगळ्या आयडीवरून हे ईमेल पाठवण्यात आले आहेत. धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये लिहिले होते, की, तुमच्या शाळेत एक अतिशय शक्तिशाली बॉम्ब ठेवण्यात आला आहे. लक्षात ठेवा हा विनोद नाहीये. हा खूप शक्तिशाली बॉम्ब आहे. ताबडतोब पोलिसांना कॉल करा. तुमच्या जीवनासह शेकडो जीवन प्रभावित होऊ शकतात. उशीर करू नका आता सर्व काही तुमच्या हातात आहे.

- Advertisement -

राज्यात हिजाबचा वाद पेटला असतानाच काही शाळांमध्ये मुलींना हिजाब घालण्यापासून रोखल्यानंतर उग्र निदर्शने झाली. नंतर उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


हेही वाचा : Sanjay Raut: एसटी आंदोलकांना चिथावण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचं राज्य यांच्या डोळ्यांत खुपतंय – खासदार संजय राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -