घरदेश-विदेशराहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा; 'चौकीदार चोर है' वक्तव्याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत कारवाई न...

राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा; ‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

Subscribe

‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘चौकीदार चोर है’ असा उल्लेख केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्याने मानहानीची तक्रार केली. या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात २० डिसेंबरपर्यंत कारवाई करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्याने गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली असता त्यांना आज हंगामी दिलासा मिळाला. मानहानीच्या या खटल्यात २० डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिले.

- Advertisement -

महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी मानहानीची तक्रार केली आहे. ही तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्या अर्जावर आज न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदारांचे वकील रोहन महाडिक यांनी राहुल यांच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली.

नेमकं प्रकरण काय आहे?

राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘चौकीदार चोर है’ असा केला होता. ही टीका म्हणजे मोदी यांच्याबरोबरच त्यांना मानणाऱ्या सर्व भारतीयांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा अवमान असल्याचा आरोप करत महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी मानहानीची तक्रार दाखल केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -