घरताज्या घडामोडीसावधान! प्रदूषणाचा स्मरणशक्तीवरही परिणाम, तुम्हांलाही वस्तूंचा विसर पडतोय का?

सावधान! प्रदूषणाचा स्मरणशक्तीवरही परिणाम, तुम्हांलाही वस्तूंचा विसर पडतोय का?

Subscribe

वायू प्रदूषणाचा शरीरावर विपरित परिणाम होतो हे आपण शाळेत असताना वाचलेले आणि ऐकलेले असेलच. पण आता याच प्रदूषणाचा थेट स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. क्विन्सलँड युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

या संशोधनात ज्या परिसरात सर्वाधिक प्रदूषण आहे तेथील नागरिकांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. तसेच येथील नागरिकांच्या कार्यक्षमतेवरही प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. या भागात राहणाऱ्या तरुण तरुणींच्या कामावर या प्रदूषणाचा परिणाम झाला असून नवीन काही शिकण्यासाठीही या तरुणांना आधीच्या तुलनेत बराच वेळ लागत आहे. तज्त्रांच्या मते हवेतील PM 2.5 कण हे सूक्ष्म असतात. त्यामुळे ते श्वासातून फुफ्फुसापर्यंत पोहचतात. तेथून ते रक्तात मिसळतात आणि हृदयापर्यंत पोहचतात. ज्यामुळे हृदयविकार बळावतो.

- Advertisement -

प्रामुख्याने पन्नाशीच्या आतील व्यक्तींवर या प्रदूषणाचा परिणाम होत आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामांवरही याचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे यातील तरुण तरुणींना साध्या कामांचा विसर पडत आहे. ऑस्ट्रेलियात सध्या वणवा पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असून नासाने पाठवलेल्या फोटोमध्ये प्रदुषणाची चादरच दिल्ली, नोएडावर पसरल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे येथील तरुणांनाही स्मरणशक्तीशी निगडीत समस्या भेडसावू लागल्या आहेत. सध्या दिल्लीत PM 2.5 च्या स्तरावर प्रदूषण आहे. त्यामुळे .येथील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास. खोकला, छाती भरणे असा त्रास होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -