घरदेश-विदेशजागतिक शांततेसाठी दोन्ही देश सोबत काम करण्यास कटीबद्ध; पंतप्रधान मोदींचे व्हाइट हाऊसमधून...

जागतिक शांततेसाठी दोन्ही देश सोबत काम करण्यास कटीबद्ध; पंतप्रधान मोदींचे व्हाइट हाऊसमधून वक्तव्य

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज व्हाइट हाऊसमधून (White House) संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक शांततेसाठी दोन्ही देश सोबत काम करण्यास कटीबद्ध असल्याचे वक्तव्य केले. तसेच त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना मिळालेला सन्मान हा भारतातील 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि जिल बिडेन यांचे आभार मानले. (Both countries committed to work together for world peace Prime Minister Modi’s statement from the White House)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, तीन दशकांपूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आलो होतो तेव्हा व्हाइट हाऊस बाहेरून बघितले. त्यानंतर पंतप्रधान असताना अनेकवेळा अमेरिकेत आलो, पण इतक्या भारतीय अमेरिकनांसाठी व्हाइट हाऊसचे दरवाजे उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही देशांना त्यांच्या विविधतेचा अभिमान वाटतो, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पाटण्यात विरोधी पक्ष एकवटणार, उद्धव ठाकरे- शरद पवारांसह हे नेते राहणार उपस्थित

दोन्ही देश एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध

मोदी म्हणाले की, आमचा पाया लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री संपूर्ण जगाची क्षमता वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच आमची मैत्री जगाला पूरक ठरेल. परदेशातील भारतीय अमेरिकेचा अभिमान वाढवत आहेत. तुम्ही सर्व आमच्या नात्याची खरी ताकद आहात, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

दोन्ही देशाचा ध्वज उंचच राहावी अशी आमची इच्छा

मोदी म्हणाले की, आमचा सार्वभौम कल्याण आणि सार्वत्रिक आनंदावर विश्वास आहे. कोरोनाच्या काळानंतर संपूर्ण जगाला एका वेगळ्या रूपात पाहिले आहे. दोन्ही देशांनी जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला आहे. भारत आणि अमेरिकेचा ध्वज असाच उंच राहावा अशी आमची इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

मोदी, जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठकीला सुरूवात

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठकील सुरूवात झाली आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील परस्पर सहकार्य, राजकीय संबंधांना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे.  कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -