घरCORONA UPDATEलॉकडाऊनचा किस्सा..लग्न न करताच नवरी आली सासरी!

लॉकडाऊनचा किस्सा..लग्न न करताच नवरी आली सासरी!

Subscribe

या मुलीने लग्न ठरलेल्या दिवशी म्हणजे २५ एप्रिलला सासरी रहायला जायचा निर्णय घेतला.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कदाचीत हा लॉकडाऊन वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकांना या लॉकडाऊनमुळे आपले अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. लग्नासारखी शुभ कार्यही अनेकांनी पुढे ढकलण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी नातेवाईक, बँड बाजा न बोलवताच अगदी साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पाडण्यात येत आहे. मात्र इथे एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. झारखंडमधील एका गावात हा प्रकार घडला आहे.

२५ एप्रिलला एका मुलीचं लग्न होणार होतं. तीचे वडील परदेशात नोकरी करत होते. लग्न ठरताच मुलीचे वडील लॉकडाऊनच्या आधी भारतता आले. दोन्ही कडे लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. याचदरम्यान देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता लग्न होणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर आणखी किती काळ लॉकडाऊन वाढेल हे सांगणं शक्य नसल्यामुळे लग्नाची तारीख ठरवता येत नव्हती. पण मुलीला आणि मुलाला लग्न करायचे होते.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये मंदिर बंद असल्यामुळे मंदिरात लग्न करणंही शक्य नव्हतं. शेवटी मुलीने आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना पटवून लग्न ठरलेल्या दिवशी म्हणजे २५ एप्रिलला सासरी रहायला जायचा निर्णय घेतला. मुलाच्या घरच्यांनी तीला स्विकारत आर्शिवाद दिला.

या दोघांचही हे अरेंज मॅरेज होते. ते दोघे एकमेकांना आधीपासून अजिबात ओळखत नव्हते. त्यांच लग्न ठरल्यावर त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर आम्ही आमच्या नातेवाईकांना स्नेह भोजन देणार आहोत.

- Advertisement -

हे ही वाचा – Video: लॉकडाऊनमध्ये सपना चौधरीला फॅन्सची आठवण, ‘हा’ व्हीडिओ झाला व्हायरल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -