घरCORONA UPDATEकोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांच्या परिवाराला ५० लाखांची मदत!

कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांच्या परिवाराला ५० लाखांची मदत!

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रस्त्यावर ड्युटी करणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यातच कोरोनामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेले चंद्रकांत पेंदुरकर आणि संदीप सुर्वे यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५० लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री ट्वीटरवरून ही माहिती जाहीर केली आहे. ‘राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभे आहे’, असं देखील अनिल देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या मदतीसाठी आता नोडल अधिकारी!

एकीकडे राज्यातल्या जनतेला मदत करण्याचं काम पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करत असताना दुसरीकडे त्यांनाच अडचणीच्या वेळी मदत मिळत नसल्याचं भीषण चित्र राज्यात निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी खुद्द पोलिसांना देखील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या उपचारांमध्ये देखील दिरंगाई होत असल्याचं काही प्रकरणांमध्ये दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारकडून पोलिसांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आणि त्यांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबईसाठी नवल बजाज हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव सिंघल नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -