घरदेश-विदेशविमानात आणि जहाजात मिळणार इंटरनेटची सुविधा

विमानात आणि जहाजात मिळणार इंटरनेटची सुविधा

Subscribe

भारतातून उड्डाण करणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या कंपन्यांना बीएसएनएलच्या इंटरनेटचा वापर करावा लागणार आहे.या सुविधेमुळे समुद्रात जहाजांमध्ये, विमानत या सेवा वापरता येणार आहेत.

आता तुम्हाला विमानात आणि समुद्रातही इंटरनेटचा वापरण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. हे शक्य आहे केवळ भारत संचार निगम कंपनी म्हणजेच बीएसएनएल कंपनीमुळे. यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे. ही सुविधा बीएसएनएलची विदेशी भागीदार असलेल्या इनमारसॅटद्वारे देण्यात येणार आहे.

या द्वारे अनुभवा बीएसएनएलची सुविधा

- Advertisement -

भारतातून उड्डाण करणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या कंपन्यांना बीएसएनएलच्या इंटरनेटचा वापर करावा लागणार आहे. या एअरलाइन्सना बीएसएनएलच्या के केड बँड, स्विफ्ट ब्रॉडबँड आणि फ्लिट ब्रॉडबँड सेवा घेता येणार आहेत. या सुविधेमुळे समुद्रात जहाजांमध्ये, विमानत या सेवा वापरता येणार आहेत.

टाटा टेलिनेट, ह्युजेस इंडिया, सरकारी कंपनी बीएसएनएल आणि ओमिनी कनेक्ट या कंपन्यांनी बीएसएनएलच्या सुविधांसाठी अर्ज केला आहे. लवकरच यावर निर्णय घेऊन दूरसंचार विभाग त्याला परवानगी देईल. भारतीय हवाई हद्दीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली नसल्याने भारतीय हवाई हद्दीत एअर एशिया, एअर फ्रान्स, ब्रिटिश एअरवेज या परदेशी कंपन्या कार्यान्वित नाही आहेत. 30 परदेशी विमान कंपन्या भारतीय हवाई हद्दीपासून अन्य देशात या कंपन्या इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीची सुविधा देतात.

- Advertisement -

सध्या भारतात प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान वायफाय सुविधा मिळत नाही. मात्र, लुफ्थान्सा, कतार एअरवेज आणि स्पाइसजेटने नुकतीच आपल्या विमानांमध्ये वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -