घरदेश-विदेशव्हॉट्सअॅपचा डीपी बदलला आणि जिवानिशी गेला

व्हॉट्सअॅपचा डीपी बदलला आणि जिवानिशी गेला

Subscribe

हरयाणातील सोनीपत जिल्ह्यात व्हॉट्सअॅपमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जौहर कुटुंबातील सदस्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. या ग्रुपचा डीपी म्हणजेच प्रोफाईल फोटो बदलल्याच्या रागातून एका तरुणाला व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत लव जौहर याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एकाच कुटुंबातील आठ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

सोनीपत जिल्ह्यात जौहर हे कुटुंब राहात आहे. या कुटुंबातील सदस्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर रविवारी रात्री चॅट सुरू होते. त्यादरम्यान त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. हा वाद सुरू असतानाच ग्रुपच्या अॅडमिनपैकी लव जौहर यानं ग्रुपचा प्रोफाइल फोटो बदलला. लवनं बदलेला फोटो ग्रुपमधील इतर सदस्यांना आवडला नसल्यानं त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. डीपी बदलल्याच्या रागातून लवला ग्रुपमधून काढून टाकलं.

- Advertisement -

लव बाहेर आल्यानंतर त्याच्या ग्रुपमधील इतर सदस्यांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत लव जबर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती लवचा भाऊ अजय जौहर यानं दिली. या प्रकरणी जौहर कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -