घरदेश-विदेशCAG Recruitment 2021 : ऑडिटर, अकाऊंटंट पदासाठी १०, ८११ जागा

CAG Recruitment 2021 : ऑडिटर, अकाऊंटंट पदासाठी १०, ८११ जागा

Subscribe

कंप्ट्रोलर एण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (CAG) नवी दिल्ली कार्यालयामार्फत एकुण १० हजार ८११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. देशभरातील नेमणुकांसाठीचे हे अर्ज असतील. ही सगळी भरती प्रक्रिया अकाऊंटंट आणि ऑडिटर्स पदासाठी राबविण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांना येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहेत. कॅगचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या cag.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. माहितीचा भरणा करून हे अर्ज ऑफलाईन मोडमध्ये द्यायचे आहेत असे कॅगमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. कॅगच्या या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठामार्फतची पदवी तसेच स्थानिक भाषेत प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ज्या राज्यामध्ये या भरती प्रक्रियेसाठी रिक्त जागा असतील त्याठिकाणची स्थानिक भाषा येणे गरजेचे असून भाषेची चाचणीही घेण्यात येणार असल्याचे कॅगने स्पष्ट केले आहे. त्या राज्यातील स्टेट अकाऊंट जनरलच्या स्थानिक भाषेच्या गरजेनुसार हा निकष लागू असेल असे कॅगने स्पष्ट केले आहे.

काय आहेत अटी

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
वयाची अट – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे या दरम्यान असावे
(अनुसुचित जाती, जमाती, माजी सैनिक, विशेष श्रेणीसाठी वयाची आणि विशेष सवलतीचा निकष हा केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लागू असेल.)

- Advertisement -

वेतन

CAG ऑडिटर किंवा अकाऊंटंट म्हणून नेमणुक झाल्यानंतर उमेदवाराला कॅगमार्फत लेव्हल ५ अंतर्गत ( २९ हजार २०० रूपये ते ९२ हजार ३०० रूपये) इतके वेतन देण्यात येईल.

अर्ज कुठे व कसा कराल ?

CAG चे संकेतस्थळ cag.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट नोटीफिकेशन क्लिक करा

- Advertisement -

भरती प्रक्रियेसाठीची संपुर्ण माहिती वाचा

तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर अर्ज डाऊनलोड करा

तुमचा संपुर्ण अर्ज भरा.

श्री वि एस वेंकटनाथन, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, ९, दीन दयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली ११०१२४ या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवा.


 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -