घरटेक-वेकटिकटॉकची भारतातून एक्झिट, व्यवसाय करणार बंद

टिकटॉकची भारतातून एक्झिट, व्यवसाय करणार बंद

Subscribe

बाईटडान्सचा मोठा निर्णय

चीनी सोशल मिडीया कंपनी बाइटडांसने भारतातून आपला गाशा गुंडळण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या कंपनीचे टिकटॉक आणि हॅलोवर मालकी होती. भारतात टिकटॉक आणि हॅलो ॲपवर बंदी घातली आहे. या ॲपसह इतर ५९ ॲप्सवर बंदी घातली आहे. टिकटॉकचे प्रमुख वेनेसा पाप्पस आणि जागतिक जागतिक व्यावसायाचे उपाध्यक्ष ब्लेक चांडली यांनी भारतातील टिकटॉक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, आम्ही भारतातील कंपनीत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचे अगाऊ वेतनही देण्यात आले आहे.

टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी भारतात पुन्हा टिकटॉक सुरु करण्याबाबत काही कल्पना नसल्याचे सांगत येणाऱ्या काळात पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. तर ईमेलमध्ये असेही म्टले आहे की, आम्ही शाश्वती देऊ शकत नाही की, पुन्हा भारतात कधी कंपनी सुरु होईल. परंतु भारतात पुन्हा टिकटॉक सुरु करण्यासाठी प्रयत्न करत राहू असे टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

बाइटडान्सने एका टाउन हॉलमचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी भारतातून आपली कंपनी बंद करणार असल्याचे सांगितले. तर टिकटॉकच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, कंपनी २९ जून २०२० पासून भारत सरकारच्या आदेशांचे पालन करत आहेत.

भारतातील २००० कर्मचाऱ्यांना फटका

प्रवक्त्याने सांगितले की, भारतात पुन्हा टिकटॉक सुरु करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. परंतु कंपनी सुरु करण्यासाठी अजूनही सकारात्मक चर्चा झाली नाही. त्यामुळे याचा परिणाम भारतातील कर्मचाऱ्यांवर झाला आहे. भारतातील २००० कर्मचाऱ्यांना गेल्या ७ महिन्यांपासून राखून ठेवले होते. परंतु आता कर्मचाऱ्यांमध्ये घट करण्यावाचून आमच्याकडे इतर पर्याय नसल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

- Advertisement -

टिकटॉक भारतात पुन्हा सुरु करण्यासाठी बाइटडान्स कंपनी प्रयत्न करत आहे. भारत सरकारने जून २०२० मध्ये टिकटॉवर बंदी आणली होती. टिकटॉकसह, हॅलो आणि इतर ५९ ॲप्सवर बंदी आणली आहे. कंपनीने केलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, आम्ही सर्व खर्च कमी केला आहे. आमचे ॲप्स कार्यरत नसताना आम्ही कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडू शकत नाही. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम आम्ही जाणतो तसेच आम्हाला कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -