घरदेश-विदेशप्रियांकाच्या ट्विटवर कमेंट करणे भारतीय शेफला पडले महागात

प्रियांकाच्या ट्विटवर कमेंट करणे भारतीय शेफला पडले महागात

Subscribe

अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा’च्या ट्विटवर कमेंट करने एका भारतीय वंक्षाच्या शेफला चांगलेच महागात पडले आहे. या कमेंटमुळे संयुक्त अरब अमिरात (युएई) येथील हॉटेलने त्याच्याबरोबर केलेला करार रद्द केला असून त्याला नोकरीवरून काढून टाकले. अतूल कोचर असे या शेफचे नाव असून तो दूबई येथील जेडब्लू मैरियट मार्क्यिस हॉटेलमध्ये काम करत होता. ट्विटवरुन उद्भवलेल्या वादानंतर त्याने आपली वादग्रस्त कमेंट डिलीट करुन त्याने आपल्या कृत्याची ट्विटवरुन माफी मागितली आहे.

priyanaka chopda tweet
प्रियांकाने केलेले ट्विट

का केले प्रियांकाने ट्विट
‘क्वांटिको’ या अमेरिकन टिव्ही मालिकेत प्रियांका भूमिका केली होती. या मालिकेत काही भारतीयांना दहशतवाद्यांची भूमिकेत दाखवले होते. प्रियांकाने ट्विटकरुन या बद्दल माफी मागत आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ट्विट केले होते.दोन हजार वर्ष जुन्या इस्लाम धर्मातील दहशतवादाबाबत भितीचे वातावरण निर्माण झालेल्या हिदूंच्या भावनांचा आदर न केल्याने प्रियांकाला लाज वाटली पाहिजे असल्याची कमेंट अतूलने केली होती.

- Advertisement -

एचआर कडून मिळाला मेल
अतूलच्या या कमेंटनंतर त्याला हॉटेलच्या एचआरकडून मेल प्राप्त झाला. यामध्ये त्याच्या बरोबर केलेला करार रद्द करण्याचा मजकूर होता.
या मेलमधील मजकूर पुढील प्रमाणे –
” ‘अतूल’द्वारे केलेल्या कमेंटमुळे रंग महलसाठी केला गेलेला करार आम्ही रद्द करत आहोत. शेफ अतूल हा येथून पुढे हॉटेलसाठी सेवा पूरवणार नाही. हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व पाहूण्यांच्या विविध संस्कृतीचा आदर केला जातो. येथे येणाऱ्या प्रत्येकाला उच्च दर्जाची वागणूक दिली जाते.”

एचआरकडून मिळालेला मेल

ट्विटकरुन मागीतली माफी
ट्विटकरुन माफी मागत अतूलने लिहीले की, ” मी केलेल्या कमेंटचे समर्थन करत नाही. १ हजार ४०० वर्ष पूर्वी सुरु झालेल्या इस्लाम बाबत केलेल्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो. मी इस्लामोफोबिक नसून मी केलेल्या कमेंट बद्दल मला पश्चाताप होत आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -