घरदेश-विदेशखुल्या जागी अंडरवेअर वाळत घातल्यामुळे गुन्हा दाखल!

खुल्या जागी अंडरवेअर वाळत घातल्यामुळे गुन्हा दाखल!

Subscribe

मुजफ्फरनगरमध्ये चक्क पोलिसांनी खुल्या जागी अंडरवेअर घातल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हावर पोलिसांनी तात्काळ कारवाई देखील सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात मागील २४ वर्षांपासून भ्रष्टाचार आणि भुमाफियांविरोधात कलेक्टर कार्यालयात धरणे धरणार्‍या मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी खुल्या जागी अंडरवेअर वाळत घातली म्हणून चक्क गुन्हा नोंदवला आहे. नुकतेच मुजफ्फरनगरच्या कलेक्टर सेल्वा कुमारी यांनी मास्टर विजय सिंह यांची मनधरणी करून त्यांना आपले धरणे आंदोलन मागे घ्यायला लावले होते. कलेक्टर यांच्या विनंतीवरून मास्टर विजय सिंह यांनी कलेक्टर ऑफिसमधील आपले धरणे मागे घेऊन शिव चौकात सुरू केली होते.

नक्की वाचा‘या’ सेलिब्रिटीवर सख्ख्या बहिणीने केला बलात्कार

- Advertisement -

स्त्रीला लज्जा येईल असे कृत्य केल्यामुळे गुन्हा दाखल

शनिवारी मास्टर विजय सिंह यांच्याविरोधात नाजिर सदर पोलीस ठाण्यात ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कलमांतर्गत स्त्रीला लज्जा येईल असे कृत्य केल्यामुळे गुन्हा दाखल होते. मास्टर विजय सिंह यांच्यावर नाजिर सदर पोलीस ठाण्याचे संजय कुमार यांनी कलेक्टर कार्यालयामध्ये धरण्यावर बसले असताना खुल्या जागी अंडरवेअर वाळत घालण्याचा आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई देखील सुरू केली.

हेही वाचामार्कांच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

- Advertisement -

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुकात नोंद

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मास्टर विजय सिंह म्हणाले की, ‘मी माझे धरणे आंदोलन मागे घेणार नाही. पोलिसांनी मला फाशीवर लटकवले तरी बेहत्तर. पुन्हा तो अंडरवेअर माझा नाही. तर माझ्यासोबत राहणार्‍या एका अनाथाचा आहे.’
विशेष म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात प्रदीर्घ काळ धरणे देण्याचा विक्रम विजय सिंह यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुकात नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -