घरटेक-वेकआता हेच बाकी होतं! हेडफोनसाठी काढली किडनी विकायला

आता हेच बाकी होतं! हेडफोनसाठी काढली किडनी विकायला

Subscribe

भारतात आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. आयफोन पाठोपाठ आता सेनाहायझर कंपनीच्या हेडफोनची क्रेझ भारतात पुन्हा एकदा आली आहे. या नव्या हेडफोनची किंमत ही १,८९,९० रुपये इतकी आहे. त्यामुळे ही किंमत पाहताच क्षणी प्रत्येकजण थक्क होत आहे.

एखादा हेडफोन फार फार तर किती महागडा असू शकतो? परंतु, या हेडफोनची किंमत वाचात तर तुम्हाला देखील आश्चर्याचा भलामोठा धक्का बसेल. विशेष म्हणजे भारतीय बाजारपेठेत या हेडफोनला बऱ्यापैकी मागणी आहे. सध्या हा हेडफोन चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र हा हेडफोन त्याच्यात असलेल्या फिचर्समुळे जनसामान्यांमध्ये चर्चेत आलेला नाही, तर त्याच्या किंमतीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ही चर्चा आता एवढ्यावरच थांबलेली नाही तर लोकांनी सोशल मीडियावर या हेडफोनवर विविध प्रकारचे भन्नाट मिम्स शेअर केले आहेत. याअगोदर आयफोनच्या किंमतीवरुन अशाप्रकारचे मिम्स शेअर झाले आहेत. आयफोन विकत घेण्यासाठी आम्ही किडनी आणि संपत्ती विकत आहोत, अशा प्रकारचे जोक्स याअगोदर शेअर झाले आहेत. त्यानंतर आता सेनहायझर कंपनीच्या हेडफोनच्या किंतीवरुन जोक्स व्हायरल होत आहेत.

सेनहायझर हेडफोनची किंमत ऐकून व्हाल थक्क

महागड्या आणि चैनीच्या वस्तूंप्रती लोकांच्या मनात एक वेगळे आकर्षण असते आणि भारत देशात तर याबाबत विचारायलाच नको. भारतात आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. आयफोन पाठोपाठ आता सेनाहायझर कंपनीच्या हेडफोनची क्रेझ भारतात पुन्हा एकदा आली आहे. या नव्या हेडफोनची किंमत ही १,८९,९० रुपये इतकी आहे. त्यामुळे ही किंमत पाहताच क्षणी प्रत्येकजण थक्क होत आहे. या हेडफोनमध्ये नेमके काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या हेडफोनमध्ये एअर एचडी ८२० इतकी आहे. याशिवाय सेनहायझरचा हेडफोन वापरल्यावर कानाच्या पडद्याला कोणकत्याही प्रकारचा त्रास जाणावणार नाही, अशी हमी कंपनीची आहे. याशिवाय दोन वर्षांची वॉरंटी या हेडफोनला आहे. हा हेडफोन ८,९४३ रुपयांच्या ईएमआयवर देखील उपलब्ध आहे.

- Advertisement -

हेडफोनवर लोकांच्या विनोदी प्रतिक्रिया

दरम्यान, सेनहायझरचे हे नवे हेडफोन सध्या अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. अॅमेझॉनवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसेंजीत नावाच्या एका युजरने या अॅमेझॉनवर या हेडफोनला पाच स्टार दिले आहेत. याशिवाय म्हटले आहे की, ‘हा हेडफोन अतिशय भन्नाट आहे. मी आणि माझ्या संपूर्ण मित्र परिवाराने हा हेडफोन विकत घेण्यासाठी आपल्या किडन्या विकल्या आहेत. आता आम्ही मस्तपैकी गाणी ऐकू शकतो. दररोज संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मी कानाला हे हेडफोन लावतो आणि गाणी एकतो. विशेष म्हणजे अॅमेझॉन प्राईमने या हेडफोनची फ्रि होम डिलेव्हरी केली.’ रत्ना वर्शिठ नावाच्या एका युजरने म्हटले की, ‘हे हेडफोन चांगल्या गुणवत्तेचे आहेत. या हेडफोन विकण्यासाठी मी माझी संपत्ती विकली.’ अशा प्रकारच्या भन्नाट प्रतिक्रिया सेनहायझरच्या हेडफोनवर येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आयफोन ११ लाँच झाल्यानंतर जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत घट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -