घरदेश-विदेशICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना आणि त्यांच्या पतीला CBI कडून...

ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना आणि त्यांच्या पतीला CBI कडून अटक, नेमंक प्रकरण काय?

Subscribe

आयसीआयसीआय बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने दिल्लीतून अटक केली आहे. व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जातील अनियमितता केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेने सन 2009 ते 2011 दरम्यान व्हिडीओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचे कर्ज दिले होते. मात्र या कर्ज वाटपादरम्यान गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. यावेळी बँकेने कोचर यांची बाजू घेतली. मात्र सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर बँकेने आपली भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्त केली. या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचे सीओई पद सोडावे लागले. यावेळी बँकेच्यावतीने दिलेल्या नियमाबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असे सांगितले जाते. या प्रकरणी सीबीआयने 22 जानेवारी 2019 रोजी दा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

यादरम्यान आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने जानेवारी 2022 मध्ये चंदा कोचर यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. तसेच एप्रिल 2009 ते मार्च 2018 या कालावधीत मिळालेला 7.4 कोटी रूपयांचा बोनस परत करण्याचे आदेश देत त्यांचे अन्य आर्थिक भत्तेही रोखण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान 2018 साली कोचर यांनी आपण लवकरचं निवृत्ती घेत असल्याचे बँकेला कळवलं होत, ज्यानंतर आता आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाने जानेवारी 2019 मध्ये कोचर यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केलं आहे. तसेच एप्रिल 2009 ते मार्च 2018 या कालावधीत मिळालेला 7.4 कोटी रूपयांचा बोनस परत करण्याचे आदेश देत त्यांचे अन्य आर्थिक भत्तेही रोखण्याचा निर्णय घेतला.

यानंतर या निर्णयाविरोधात चंदा कोचर यांनी बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली, मात्र कोर्टाने त्यांना कोणताही दिलास देण्यास नकार दिला. ज्याला कोचर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र सर्वोच्च न्यायालयातही कोचर यांनी दिलासा मिळाला नाही.


सबरीमालाहून दर्शन घेऊन परतताना भाविकांवर काळाचा घाला; अपघातात 8 जणांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -