घरताज्या घडामोडीCSD Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरच्या ९५ टक्के दुर्घटनांना जबाबदार IMC! बिपिन...

CSD Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टरच्या ९५ टक्के दुर्घटनांना जबाबदार IMC! बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचे हेच कारण?

Subscribe

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपीन रावत यांचा बुधवारी तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. बिपीन रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टर दुर्घटना दुसऱ्यांदा घडली. यापूर्वी फेब्रुवारी २०१५मध्ये नागालँडमधील चीता हेलिकॉप्टर उड्डाण घेताच खाली पडले होते. या दुर्घटनेमध्ये बिपीन रावत बालंबाल बचावले होते. परंतु यावेळेस तामिळानाडूतील या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण एवढी मोठी दुर्घटना झाली कशी? असा प्रश्न सर्वजण उपस्थितीत करत आहे. याबाबत अनेक एक्सपर्ट्स वेगवेगळे तर्क-वितर्क मांडत आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, यामध्ये इंस्ट्रूमेंटल मीट्रियोलॉजिकल कंडिशंस (Instrument meteorological conditions or IMC) जबाबदार आहे. ९५ टक्के दुर्घटना या IMCमुळेच घडतात.

तामिळनाडूत ज्या हेलिकॉप्टचा Mi-17V5s अपघात झाला हे खूप आधुनिक हेलिकॉप्टर आहे. रशियाच्या या हेलिकॉप्टरचा वापर जगातील जवळपास ५० देश करतात. जर चीता किंवा चेतकसोबत याची तुलना केली तर हे खूप अत्याधुनिक आहे. या हेलिकॉप्टरमध्ये शक्तिशाली इंजिनाव्यतिरिक्त हवामान रडार आणि ऑटोपायलट प्रणालीने सुसज्ज आहे. याशिवाय थंडीच्या दिवसात डोंगराळ भागात दाट धुके असल्याचे या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास त्रास होतो. २०१३ मध्ये उत्तराखंडमधील महापूरातील बचावकार्य दरम्यान Mi-17V5s हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

IMC काय आहे?

प्रत्येक फ्लाइटमध्ये आयएमसी हे सिस्टम असते, ज्यामुळे पायलटला हवामानाबाबत माहिती मिळते. नियमांनुसार ज्या फ्लाइट किंवा हेलिकॉप्टरमध्ये आयएमसी असतात, त्यामधील पायलट बाहेरचे हवामान पाहून पुढे जात नाहीत. तर ते इंस्ट्रूमेंट्सच्या आधाराने पुढे जातात. साधारपणे जेव्हा अंधारात २००० फूटपर्यंत उंची असते, ढगांचा घेराव २०० फुटांपर्यंत असते, अशा परिस्थितीत पायलट नेहमी IMC चा वापर करतात.

तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेवर एक्सपर्टचे मत

Mi-17V5s एक असे हेलिकॉप्टर आहे, जे खराब वातावरणात देखील उड्डाण करू शकते. एक्सपर्ट्सच्या मते, धुक्यामुळे हा अपघात झाला असावा. तसेच हेलिकॉप्टर झाडाच्या खोडाला आदळले असावे किंवा रोटर केबलमध्ये अडकले असावे, असे वाटते.

- Advertisement -

दरम्यान Mi-17V5s हेलिकॉफ्टरचा फ्लाइट डेटा रेकॉर्ड मिळाला आहे. तपासाच्या दृष्टीकोनातून ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचा आहे. तपासा दरम्यान नेमकी ही दुर्घटना का झाली?, पायलटने अखेरेस काय केले होते? हे समजले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -