घरदेश-विदेशजुन्या वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स

जुन्या वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स

Subscribe

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या वाहनांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वातावारण प्रदूषित करणार्‍या जुन्या वाहनांकडून आता ग्रीन टॅक्स आकारला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. औपचारिक स्वरुपात हा कर लागू करण्यापूर्वी तो राज्य सरकारांच्या सल्लामसलतीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

8 वर्षांपेक्षा जुन्या ट्रान्सपोर्ट वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्राच्या नुतनीकरणादरम्यान 10 ते 25 टक्क्यांपर्यंत ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो.15 वर्षांपेक्षा जुन्या खाजगी गाड्यांवरही हा टॅक्स लावला जाणार आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट गाड्या म्हणजे सिटी बस अशा प्रकारच्या वाहनांना हा कर कमी प्रमाणात असेल. जास्त प्रदूषण असणार्‍या शहरांमध्ये नोंदणीकृत वाहनांवर 50 टक्क्यांहून अधिक ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो. दरम्यान इंधन आणि वाहनांनुसार हा टॅक्स कमी जास्त असू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -