घरताज्या घडामोडीCorona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; गर्दी टाळण्यासाठी नवीन...

Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; गर्दी टाळण्यासाठी नवीन वेळापत्रक

Subscribe

अपंग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचा सल्ला दिला असून वर्क फ्रॉम होम करण्यास केंद्र सरकारने सांगितले.

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ झाली आहे. तसेच आतापर्यंत १ हजार ७०० ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. अशा परिस्थिती सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्यात आली आहे. तसेच अवर सचिव आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यास सक्तीचे करण्यात आले असून यापेक्षा खालच्या श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याबाबतचे पत्रक जारी करण्यात आले आहे.

देशात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून वर्क फ्रॉम होमचा आदेश जारी करून गर्दी टाळण्यासाठी नवीन वेळापत्रक दिले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, अवर सचिव आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून ५० टक्क्यांच्या क्षमतेने हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन आदेश ३१ जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत.

- Advertisement -

अपंग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचा सल्ला दिला असून वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कंटेनमेंट झोन डी-नोटिफाईड होत नाही तोपर्यंत कार्यालयात न येण्याची सूट दिली आहे. कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळा आखून दिल्या आहेत. सकाळी ९ ते ५.३० आणि सकाळी १० ते ६.३० अशा दोन वेळा कार्यालयात उपस्थितीत राहण्यासाठी दिल्या आहेत.


हेही वाचा – कोरोनाचा परिणाम- कंपन्यांचे पुन्हा एप्रिलपर्यंत वर्क फ्रॉम होम

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -