ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णालयात दाखल

प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उमा चोप्रा (Uma chopra)  यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Prem Chopra and wife uma chopra corona positive ) मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनाही मुंबईच्या लिलावती रुगणालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Actor Prem Chopra and wife uma chopra corona positive hospitalized for treatment
Prem Chopra: ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडमधील कोरोनाचे जाळे दिवसेंदिवस हात पाय पसरताना दिसत आहे. एकाच दिवशी बॉलिवूडचे बडे सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. सोमवारी अभिनेता जॉन अब्राहम आणि निर्माती एकता कपूर (Ekta kapoor ) यांना कोरोनाची लागण झाली. त्यातच आता बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra)  यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. प्रेम चोप्रा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उमा चोप्रा (Uma chopra)  यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Prem Chopra and wife uma chopra corona positive ) मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनाही मुंबईच्या लिलावती रुगणालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. २-३ दिवसांनी दोघांना घरी पाठवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

प्रेम चोप्रा यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नी उमा चोप्रा यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल (Monoclonal antibody cocktail)  देण्यात आले आहेत. आणि हळू हळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. २-३ दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल अशी आशा आहे. प्रेम चोप्रा हे ८६ वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे मात्र डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. लिलावतीचे डॉ. जलील पारकर (Dr. Jalil Parkar)  प्रेम चोप्रा यांच्यावर उपचार करत आहेत.

बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमातील मुख्य खलनायक म्हणून प्रेम चोप्रा यांचे नाव घेतले जाते. बॉबी, दो दोस्त,कटी पतंग यासारख्या सुपरहीट सिनेमात प्रेम चोप्रा यांनी जबदरस्त भूमिका साकारल्या आहेत. एकूण ६० वर्षांच्या कारकिर्दीत ३५०हून अधिक सिनेमे केले आहेत.

प्रेम चोप्रा यांच्या पत्नी उमा चोप्रा यांना देखील मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले आहेत. प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा यांच्या लग्नाला ५० हून अधिक वर्ष झाले आहे. प्रेम चोप्रा यांना रकिता,पुनीत आणि प्रेरणा चोप्रा अशा तीन मुली आहेत.


हेही वाचा – Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरही Corona Positive, होम क्वारंटाईनचा निर्णय