घरदेश-विदेशCorona: 'दिल के अरमां लॉकडाऊन में बह गए...' धुमधडाक्यात करायचं होतं लग्न...

Corona: ‘दिल के अरमां लॉकडाऊन में बह गए…’ धुमधडाक्यात करायचं होतं लग्न पण झालं असं…

Subscribe

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा करताच, हा लॉकडाऊन कधी संपेल याची खात्री नसताना मधुरमीत यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आपलं लग्न जोरदार, धुमधडाक्यात व्हावं, असे सगळ्यांनाच वाटत असते. अलिशान विवाह करण्याचं स्वप्न लॉकडाऊनमुळे काहीसं अपुर्ण राहिल्याचे या जोडप्यांच्या बाबतीत दिसतंय. यांच्या विवाह सोहळ्यास वऱ्हाडी पाहुण्यांची गर्दी नसून फक्त आई-वडिलांनीच या लग्नसोहळ्यास हजेरी लावली.

कॅनडामधील ब्रॅम्प्टनमध्ये राहणारा मधुरमीत सिंग जालंधर लग्न करण्यासाठी आला होता, पण लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकललं गेलं आणि तोही देशात अडकून राहिला. मात्र पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा करताच, हा लॉकडाऊन कधी संपेल याची खात्री नसताना मधुरमीत यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. कारण कॅनेडियन सरकार आपल्या नागरिकांना परत बोलवत असून कधीही भारतातून कॅनडाला जावे लागेल, म्हणून शुक्रवारी मधुरमीतने किरतशी लग्न केले. गुरुद्वारामध्ये जाऊन श्री गुरूग्रंथ साहब यांच्या उपस्थितीत दोघांनी फेरे घेतले आणि दोघांच्या लग्नाचे विधी पार पडले. या लग्नाला मधुरमीतचे आई-वडील आणि वधूचे आई-वडील उपस्थित होते. लग्नानंतर, मधुरमीतने सांगितले की, ‘मी माझं लग्न खूप उत्साहात होईल, असे स्वप्न पाहिले होते. पण, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही इच्छा पुर्ण झाली नाही.’

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मधुरमीतची आई तजिंदर कौर जालंधरमधील स्थानिक नेहरू गार्डन शाळेमध्ये लेक्चरर आहे. वडील राजिंदरपाल सिंह हे पतारा सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. जालंधरच्या अर्बन इस्टेटमध्ये राहणाऱ्या बिक्रम सिंह गिलची मुलगी किरतशी मधुरमीत लग्न झाले .५ एप्रिल रोजी हे लग्न होणार होते या लग्नाची तयारी जानेवारीपासून कुटुंबियाने सुरू केली होती. मधुरमीतने हनीमूनसाठी हॉटेल बुकिंगपासून युरोप टूर बुक करून सर्व तयारी केली होती. जालंधरमध्ये तीन हॉटेल्समध्ये विवाह सोहळ्याचे बुकिंग केले होते, त्यासह सर्व व्यवस्था केली गेली होती.

- Advertisement -

मधुमीतने १३ मार्च रोजी कॅनडामधून सुट्टी घेतल्यानंतर लग्नासाठी जालंधर गाठले होते. अचानक कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला, दोन्ही कुटुंबांनी ठरवले की लग्न लॉकडाऊनमध्ये नाही तर नंतर झाले पाहिजे. मात्र पहिला लॉकडाऊन कालावधी संपण्यापुर्वीच पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन -२ ची घोषणा केली तेव्हा दोन्ही कुटुंबांनी लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.


व्हिडीओ कॉलवर ‘कबूल है…’ १२ जोडप्यांनी केला ऑनलाईन निकाह!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -