घरCORONA UPDATELockdown - व्हीडिओ कॉलवर पत्नीने घेतलं पतीचं अंत्यदर्शन, शेवटचं बघण्याची इच्छा अपूर्णच!

Lockdown – व्हीडिओ कॉलवर पत्नीने घेतलं पतीचं अंत्यदर्शन, शेवटचं बघण्याची इच्छा अपूर्णच!

Subscribe

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार, वाहतूक ठप्प आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सगळे होते तीथेच अडकले आहेत. त्यामुळे मुंबईत निधन झालेल्या आपल्या पतीचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉल करुन घेण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ गावी असलेल्या पत्नीवर आली. त्यामुळे ज्याबरोबर गेली ४० वर्ष संसार केला त्या जोडीदाराला भेटण्याचे भाग्य तीला मिळाले नाही.

मृत चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात कर्मचारी होते. बांदेकरांना नाटकाचं प्रचंड वेड. दोडामार्ग तालुक्यातलं मोर्ले हे त्यांचं गाव. वासंती आणि त्यांचा त्याकाळातला प्रेमविवाह! बांदेकरांचं दोन मुलगे आणि सुना असा परिवार आहे. पण दरवर्षी न चुकता आपल्या पत्नीसह आपल्या मोर्ले गावी यायचे. मोर्ले गावात दरवर्षी रामनवमीला नाट्योत्सव होतो. त्यामुळे बांदेकरही रामनवमीला आवर्जून मोर्लेत यायचेच. मोर्ले गावात सादर होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. यावेळच्या रामनवमीलाही ते येणार होते. म्हणूनच होळीला गावी आलेल्या पत्नीला त्यांनी गावीच थांबण्यास सांगितलं होतं. पण लॉकडाउन सुरू झालं आणि गावी येण्याचे सगळे मार्गच बंद झाले.

- Advertisement -

बांदेकरांची तब्येत कर्करोगांमुळे यांची आणखी खालावल्यामुळे ते रामनवमीला मोर्ले गावी येऊ शकले नाहीत. १६ एप्रिलला दुपारी दोन वाजता चंद्रकांत बांदेकरांचं अकाली निधन झालं. बांदेकरांच्या मुलांनी ही घटना मोर्लेतल्या पोलीस पाटील,  सरपंच यांना कळवली. गावी कुणी नातेवाईक नसल्याने बांदेकरांच्या मोर्लेतल्या घरी त्यांची पत्नी वासंती एकटीच होती.

कोरोनामुळे गावकरी तयार होईना

बांदेकरांचं डेथ सर्टिफिकेट गावकऱ्यांपर्यत पोहोचलं. गाडीसाठी लागणाऱ्या परवानगीची कागदपत्रेही तयार झाली. पण लॉकडाउनमुळे वासंती याना मुंबईला घेवून जायचे झाल्यास त्यांच्यासोबत गावातील कोणीतरी येणं अपेक्षीत होतं. मात्र त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाई राहणं गरजेचं असल्यामुळे वासंती यांच्यासोबत कोणीच यायाला तयार होईना.

- Advertisement -

शेवटी थोरल्या सुनेने मोर्लेचे पोलिस पाटील तुकाराम चिरमुरे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. त्या मोबाईलवरुन आपल्या पतीचा चेहरा पाहताच वासंती यानी टाहो फोडला , ” बांदेकर तुम्ही मला फसवलंत! अंधेरीतल्या मुलांनाही आईला पाहून दु:ख अनावर झालं. शेवटी व्हिडिओ कॉलवरच पुढचे सगळे विधी एकमेकाना दाखवावे लागले. खरंतर अंधेरीतल्या त्यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर संभाजीनगरमध्ये मोर्ले गावचे काही गावकरी राहतात .पण हा सर्व एरिया हॉटस्पॉट असल्यामुळे तिथल्या कुणालाही बाहेर पडून बांदेकरांच्या घरी येता आलं नाही. शेवटी पाच जणानी अॅम्ब्युलन्समधून जाऊन बांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


हे ही वाचा – संतापजनक! ‘तुला कोरोना झाला आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -