घरदेश-विदेशचार दिवसात चाळीस जणांनी तरुणीवर केला बलात्कार

चार दिवसात चाळीस जणांनी तरुणीवर केला बलात्कार

Subscribe

चंडीगड येथील धक्कादायक घटना, गेस्ट हाऊस मधील महिलेवर केला ४० जणांनी बलात्कार.

देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना नेहेमी समोर येत असतात. प्रत्येकवेळी याहून वाईट घटना असूच शकत नाही असे वाटते. मात्र दिवसेंदिवस बलात्काराच्या क्रूर घटना समोर येत आहेत. त्यामुळे बलात्काराप्रकरणी गुन्हे आणि शिक्षा होऊनही या घटना आळा घालण्यास यश येत नसल्याचे चित्र आहे. अशीच एक माणूसकीला काळीमा फासणारी घटना चंडीगड येथे घडली आहे. चंडीगड येथील पंचकुला परिसरात असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सतत चार दिवस बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या तरुणीला एका खोलीमध्ये डांबून तिच्यावर ४० जणांनी बलात्कार केल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. चार दिवस झालेल्या छळानंतर पीडित तरुणीला तेथून पळण्यात यश मिळाले. तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर तिची तक्रार नोंदवण्यात आली आहे. वैज्ञकीय तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अद्याप दोघाजणांना अटक कली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला गेस्ट हाऊसवर नेण्यात आले होते. तेथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आले. मात्र चार दिवसांनतर या पीडितेला पळ काढण्यात यश मिळाला.”संबधीत घटना पंचकुला येथील मोरी परिसरात असलेल्या एका शासकिय गेस्ट हाऊसमध्ये घडली. मुलीची वैज्ञकिय तपासणी नंतर गेस्ट हाऊसच्या मालकाला अटक करण्यात आली. या गेस्ट हाऊसमध्ये पोलीस तपास करुन पुरावे जमा करत आहे.”- पोलिस अधिकारी रणजित सिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -