घरICC WC 2023मोहम्मद शमीच्या कामगिरीवर मुख्यमंत्री आदित्यनाथही फिदा; पाच कोटींचे दिले गिफ्ट

मोहम्मद शमीच्या कामगिरीवर मुख्यमंत्री आदित्यनाथही फिदा; पाच कोटींचे दिले गिफ्ट

Subscribe

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या मूळ गावी बांधण्यात येणाऱ्या स्टेडियमध्ये ओपन जीम बांधण्यात येणार आहे.

लखनऊ : विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असताचा दुसरीकडून एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे गाव असलेल्या सहसपूर अलीनगरमध्ये सुमारे 5 कोटी रुपये खर्चून मिनी स्टेडियम बांधण्यात येणार आहे. ही घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. (Chief Minister Adityanath also praised Mohammed Shamis performance Gift of five crores)

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या मूळ गावी बांधण्यात येणाऱ्या स्टेडियमध्ये ओपन जीम बांधण्यात येणार आहे. बहुउद्देशीय हॉल व रनिंग ट्रॅक आदींचाही समावेश असणार आहे. जिम्नॅस्टिक आणि कुस्तीसाठीही स्वतंत्र व्यवस्था असेल. शनिवारी तहसील व गट अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून स्टेडियमच्या जमिनीचे मोजमाप केले.

- Advertisement -

प्रस्तावानंतर निधीचा मार्ग मोकळा

शनिवारी (18 नोव्हेंबर) तहसील व गट अधिकाऱ्यांनी गावात पोहोचून स्टेडियमच्या जमिनीचे मोजमाप केले. त्याचा नकाशाही व्यवस्थित तयार करण्यात आला आहे. आता परिपूर्ण प्रस्ताव तयार केल्यानंतर युवक कल्याण विभाग शासनाकडे निधीची मागणी करणार आहे एकदा का या प्रस्तावाला मान्यता मिळाली म्हणजे निधीचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा : PHOTO : अंतिम सामना पाहण्यासाठी पोहचली अनुष्का; आधी वाजवल्या टाळ्या अन्…

- Advertisement -

चर्चा फक्त शमीच्या खेळाची

विश्वचषकात शमीची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे, त्यामुळे त्याचे गाव सहसपूर अलीनगरही चर्चेचे केंद्र बनले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती केवळ शमीबद्दलच बोलत असून अंतिम सामन्याची उत्सुकताही आहे. त्यांच्या गावात मिनी स्टेडियम बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा : LIVE IND vs AUS WC Final: फलंदाजाच्या फ्लॉप शोनंतर गोलंदाजांकडून चमत्काराची अपेक्षा; 241 धावांचे…

सीडीओने बघितली 16 एकर जमीन

सीडीओ अश्वनी कुमार मिश्रा यांनी शनिवारी गावाची पाहणी केली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्यांना स्टेडियमसाठी चिन्हांकित केलेली सुमारे 16 एकर जमीन दाखवली होती. पाहणी केल्यानंतर सीडीओंनी मैदानावर आपल्या मान्यतेचा शिक्का मारला होता. तसेच जमिनीचे मोजमाप करून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिनस्त अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तेव्हा आता लवकरच शमीच्या गावात स्टेडियम उभारले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -