घरताज्या घडामोडीNCP vs NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? उद्यापासून सलग...

NCP vs NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याची नियमीत सुनावणी उद्यापासून (सोमवार, २० नोव्हेंबर) केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. अजित पवार यांनी 2 जुलैला शरद पवारांपासून वेगळे होत महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच त्यांनी पक्षावरही दावा केला आणि स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जाहीर केले. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला असल्याने आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोमवारपासून सलग तीन दिवस निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

डिलिव्हरी बॉय, गृहणींच्या नावे प्रतिज्ञापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिढ्याच्या आतापर्यंत निवडणूक आयोगात तीन सुनावण्या झाल्या आहेत. शेवटची सुनावणी 9 नोव्हेंबरला झाली. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप केला. अजित पवार गटावर 420 अतंर्गत कारवाईची मागणी केली. ज्येष्ठ वकील सिंघवी यांचा दावा आहे, की अजित पवार गटाने मृत व्यक्ती, अल्पवयीन मुले, गृहणी, झुमॅटो डिलिव्हरी बॉय, सेल्स मॅनेजर अशा लोकांचे प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक प्रतिज्ञापत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शपथेवर खोटं बोलल्या प्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अॅड. सिंघवी यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : निवडणूक आयोग आता पिंजऱ्यातला पोपट झाला; ठाकरे गटाकडून हल्लाबोल

अजित पवार गटाने 20 हजार शपथपत्र दाखल केले आहेत. त्यातील 8900 शपथपत्र बनावट तथा त्रुटी असलेले त्यांच्या विरोधी पक्षाला आढळले. या त्रुटी आयोगाने मान्यही केल्याचे सिंघवी यांनी माध्यमांना सांगितले होते. अजित गटाने दिलेल्या बनावट शपथपत्रांची 24 प्रकरांमध्ये विभागणी केली आहे. त्यावरुन त्यांनी आयोगाची कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे तपासण्याचे काम होणार आहे. सोमवारपासून आता नियमीत सुनावणी होणार असून या कागदपत्रांच्या तपासणीला किती वेळ लागतो यावरच निकाल केव्हा लागणार हे ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सुनावणीला अजित पवार येणार? 

निवडणूक आयोगाच्या सुनावणीला आतापर्यंत अजित पवार स्वतः हजर झालेले नाही. मात्र शरद पवार गटाकडून शरद पवार हे पहिल्या सुनावणीला हजर होते. त्यानंतरच्या दुसऱ्या सुनावणीला सुप्रिय सुळे आणि तिसऱ्या सुनावणीला शरद पवार पुन्हा हजर झाले होते. मात्र अजित पवार एकदाही हजर राहिलेले नाही. त्यामुळे यावेळी ते सुनावणीला हजर राहाणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -