घरदेश-विदेशअज्ञात व्हायरसमुळे होणार अनेक हल्ले, 'कोरोना' तर त्यापुढे काहीच नाही!

अज्ञात व्हायरसमुळे होणार अनेक हल्ले, ‘कोरोना’ तर त्यापुढे काहीच नाही!

Subscribe

कोरोना व्हायरस ही एक 'छोटी बाब' आहे...

चीनमधील व्हायरोलॉजिस्टने नवीन अज्ञात व्हायरसच्या हल्ल्याबद्दल म्हटले आहे की, कोरोना व्हायरस ही एक ‘छोटी बाब’ आहे आणि त्या समस्येची सुरुवात आहे. चीनच्या संदिग्ध संस्था वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे उपसंचालक शी झेंगली यांनी चीनच्या सरकारी टेलिव्हिजनवर बोलताना नवीन येणाऱ्या अज्ञात व्हायरसच्या हल्ल्याबद्दल इशारा दिला आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, झेंगलीने वटवाघळांमध्ये उपस्थित असलेल्या बॅट कोरोना व्हायरसवर संशोधन केले आहे. याच कारणास्तव तिला चीनची ‘बॅट वूमन’ देखील म्हटले जाते. शी झेंगली यांनी असे सांगितले की, व्हायरसवरील संशोधनाबाबत सरकार आणि वैज्ञानिकांनी पारदर्शक असले पाहिजे. तसेच जेव्हा विज्ञानाचे राजकारण केले जाते तेव्हा ते चांगले नसते.

- Advertisement -

CCTN शी बोलताना शी झेंगली म्हणाले – जर आपल्याला पुढील माहित नसणाऱ्या व्हायरसच्या संसर्ग आजारापासून माणसांचा बचाव करायचा असेल तर आपल्याला या माहित नसणाऱ्या व्हायरसबद्दल माहिती गोळा करावी लागेल आणि जीवांमध्ये उपस्थित असलेल्या अज्ञात व्हायरसविषयी चेतावणी द्यावी लागेल. तसेच जर आपण अज्ञात व्हायरसचा अभ्यास केला नाही तर आणखी एक संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. झेंगली यांची ही मुलाखत अशा वेळी प्रसारित करण्यात आली होती, जेव्हा चीनच्या अग्रगण्य नेत्यांची वार्षिक बैठक सुरू होणार असेल.

त्याचबरोबर जगातील अनेक देश वुहानमध्ये असलेल्या चिनी लॅबला संशयाने बघत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही सांगितले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग चिनी लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा आहे. दरम्यान, चीन आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी अशा प्रकारच्या आरोपांना नकार देताना दिसतेय.


Corona: क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने चिमुरडीचा झाला मृत्यू!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -