Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी China Vaccine Diplomacy: लसीच्या बाजारावर चीनची नजर; राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मोठी...

China Vaccine Diplomacy: लसीच्या बाजारावर चीनची नजर; राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मोठी घोषणा

Subscribe

जगभरात डेल्टा व्हेरियंटची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जगभरात लसीची मागणी वाढली आहे. जगातील सर्व देश लवकरात लवकर आपल्या सर्व लोकांचे लसीकरण करू इच्छित आहेत. परंतु लसीची कमतरता भासत असल्यामुळे मागणी आणि पुरवठाचा प्रश्न आणखीन तीव्र होत आहे. लसीची जितकी मागणी आहे, तितका पुरवठा होत नाही आहे. अशातच आता चीन लसीच्या बाजारात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी योजना करत आहे. त्यामुळे सध्या चीनची वॅक्सीन डिप्लोमेसी चर्चेत आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. चीनमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या केसेस समोर येत आहे. अशा परिस्थितीत, चीनसमोर दुहेरी आव्हान आहे की, ते आपल्या देशात लसीकरण मोहीमेला गती देऊन ते जगाला पुरवठा कसा करेल.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे जगभरात लस पुरवठा करण्याच्या धोरणावर अधिक भर देत आहे. ते म्हणाले की, ‘या महिन्याच्या अखेपर्यंत जगातील वेगवेगळ्या देशांपर्यंत दोन अब्ज लस पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.’ दरम्यान चीनच्या राष्ट्रपतींनी हे नाही सांगितले की, बीजिंग यामधून किती लस विक्री करेल आणि किती गरीब देशांना मोफत देईल. तसेच कशाप्रकारे लसीचा पुरवठा केला जाईल.चीनीच्या राष्ट्रपतींनी हा संदेश आपला संदेश एका व्हिडिओ मॅसेजच्या माध्यमातून दिला आहे. सीसीटीव्ही न्यूजच्या माध्यमातून या व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान चीनच्या राष्ट्रपतींनी १० कोटी डॉलरच्या लसीचे डोस इंटरनॅशनल लसीच्या मोहिमअंतर्गत मोफत देणार असल्याचे म्हटले आहे. या मोहिमेच नाव कोवॅक्स आहे. जागतिक आरोग्य संघटना ही मोहीमे चालवतेय. या मोहिमअंतर्गत जगातील गरीब देशांना लसीचा पुरवठा केला जातोय. गेल्या आठवड्यात चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता लिजियान म्हणाले की, देशाने आतापर्यंत जगाला ७० कोटी लसीचे डोस दिले आहेत.


हेही वाचा – भारतात लवकरच मिळणार ‘सिंगल डोस’ कोरोना लस, जॉनसन अँड जॉनसनने केला अर्ज


- Advertisement -
- Advertisement -
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -