घरCORONA UPDATEभारतात लवकरच मिळणार 'सिंगल डोस' कोरोना लस, जॉनसन अँड जॉनसनने केला अर्ज

भारतात लवकरच मिळणार ‘सिंगल डोस’ कोरोना लस, जॉनसन अँड जॉनसनने केला अर्ज

Subscribe

भारतात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात आता आणखी काही कोरोनाविरोधी लसींना भारतात परवानगी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अशातच कोरोना लसीबाबत एक नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात लवकरचं सिंगल डोस कोरोनानविरोधी लस नागरिकांना मिळणार आहे. अमेरिकन फार्मा कंपनी जॉनसन अँड जॉनसनने भारतात वाढत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सिंगल डोस लशीच्या आत्पकालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. भारत सरकराने या लशीला मंजुरी दिल्यास देशात कोरोनाविरोधी चौथी लस उपलब्ध होणार आहे.


या विदेशी लशीमुळे भारतातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतात कोव्हिशील्ड, कोवॅक्सीन, आणि रशियन स्पूटनिक व्ही या लशी वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र या तीनही लसींचे डबल डोस घ्यावा लागतो. त्यामुळे जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला महत्त्व प्राप्त होईल. भारतात आत्तापर्यंत ४९.५३ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

यावर जॉनसन अँड जॉनसन कंपनीने सोमवारी माहिती दिली की, सिंगल डोस लसीसंदर्भात कंपनीकडून भारत सरकारशी चर्चा सुरु आहे. यामुळे भारतात लवकरचं मंजुरी मिळू शकेल यासाठी कंपनी आशावादी आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने एका वक्तव्यात म्हटले की, जॉनसन अँड जॉनसन प्रायव्हेट लिमिटेडने ५ ऑगस्ट रोजी भारत सरकारकडे सिंगल डोस कोव्हिड १९ लसीच्या ईयूसाठी अर्ज केला आहे. मात्र अमेरिकन सरकारने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर या लसीचे ट्रायल पूर्णपणे बंद केले आहेत.


बिग बींच्या फ्रेंच दाढी ठेवण्यामागे ‘हे’ आहे कारण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -