घरदेश-विदेश...तर आम्ही मोदींना मदत करु - चीन

…तर आम्ही मोदींना मदत करु – चीन

Subscribe

'भारतात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही मोदींची मदत करु', असे चीनने म्हटले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मध्ये यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी साडे चार वर्षांपूर्वी सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. ‘अच्छे दिन’ येणार या आशेने लोकांनी त्यांना निवडून आणले होते. परंतु, ‘अच्छे दिन’चे आश्वासन पूर्ण न झाल्याने जनतेच्या मनात मोदींबाबत असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात मोदींविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला आता फक्त दोन ते तीन महिन्यांचा अवकाश असताना चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील द्विपक्षीय संबंध सुधारत आहे, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. सध्या मोदींनी रोजगार निर्माण करुन जनतेचा असंतोष दूर करावा, असे आवाहन चीनने केले आहे. या कार्यात चीन मोदींना मदत करणार असल्याचेही चीनने म्हटले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मधून हे वृत्त छापून आले आहे.

‘मोदींनी स्वत:ची प्रतिमा सुधारावी’

चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये म्हटले आहे की, ‘भारतातले केंद्र सरकार कमजोर आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. भारत आणि चीनदरम्यान आर्थिक द्विपक्षीय संबंझध मजबूत आहे आणि ते वेगाने पुढे जात आहे. त्याचबरोबर मोदींनी चीनकडून आर्थिक गुंतवणूक वाढवल्यास भारतात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात. दिल्लीने चीनमधील गुंतवणूक थांबवल्यास अनेकांच्या नोकऱ्या जावू शकतात. त्यामुळे भारताने चीनमधील गुंतवणूक वाढवावी.’

- Advertisement -

बिल गेट्सनेही केले होते कौतुक

देशात लवकरच लोकशभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या दरम्यान २६ जानेवारी २०१८ ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर भाषण करताना ‘आयुष्यमान भारत’ योजनेबद्दल भरभरुन बोलले. या योजनेचे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी देखील कौतुक केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव चांगले आहे. गेल्यावर्षी डोकलाम येथे चीन आणि भारताचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. आता खुद्द चीन सरकारने मोदींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मोदी सरकारला या आगामी लोकसभा निवडणुकीत या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -