घरदेश-विदेशबिल गेट्स यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन!

बिल गेट्स यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन!

Subscribe

मोदी सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये 'आयुष्यमान भारत' ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत १०० दिवसांमध्ये ६ कोटी पेक्षा जास्त लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ख्याती असलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.

मायक्रोसाॅफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन कले आहे. गेट्स यांनी ट्विटरवर मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे. मोदी सरकारने गरिब आणि होतकरू जनतेसाठी विविध योजनांची सुरूवात केली आहे. येथील काही योजना जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘आयुष्यमान भारत’ योजनेसंदर्भात एक महत्वाचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले होते की, १०० दिवसांमध्ये ‘आयुष्यमान भारत’ या योजनेला सामान्य जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. १०० दिवसांमध्ये ६ लाख ८५ हजार नागरिकांनी या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे देखील त्यांनी म्हटले होते. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा फायदा ५० करोड भारतीयांना होत असल्याचे म्हटले आहे.

बिल गेट्स यांनी केले अभिनंदन

जे. पी. नड्डा यांच्या ट्विटनंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. १०० दिवसांमध्ये ६ लाख पेक्षा जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घेतला, या गोष्टीचा त्यांना आनंद झाला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – ‘मार्क झुकरबर्ग’ जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -