घरदेश-विदेशबँक कर्मचारी बनला 'स्पायडरमॅन'

बँक कर्मचारी बनला ‘स्पायडरमॅन’

Subscribe

ऑफिसच्या शेवटच्या दिवशी एक बँक कर्मचारी ऑफिसमध्ये स्पायडरमॅनच्या वेशात आला. त्याच्या सह कर्मचाऱ्यांनी त्याच्या शेवटच्या दिवसाचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले.

अनेक कर्मचारी ऑफिसमधला शेवटचा दिवस हा आनंदाने साजरा करतात. अनेक वर्ष काम केलेल्या ऑफिसला जेव्हा सोडून जाण्याची वेळ येते तेव्हा काहीजण भावनिक होतांना दिसतात. मात्र ब्राझिलमध्ये एका बँक कर्मचाऱ्याने ‘स्पायडरमॅन’चा गणवेश घालून ऑफिसचा शेवटचा दिवस गाजवला. त्याच्या या विचित्र कल्पनेमुळे त्याचे सहकारी  आश्चर्यचकित झालेत. सहकाऱ्यांनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढलेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनोख्या पद्धतीने शेवटचा दिवस साजरा करणाऱ्या या अवलियाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा प्रकार ब्राझीलमधील एका बँकेत घडला. कामाच्या शेवटच्या दिवशी हा कर्मचारी चक्क स्पायडमॅनच्या वेशात पोहोचला. इतकंच नाही तर त्याने वेशातच दिवसभरातील कामही पूर्ण केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये

५१ सेकंदाच्या या व्हिडिओत कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना दिसतो. तसेच प्रत्येकाला काही तरी देतानाही दिसतो. ऑफिसमधील रोजची कामे तो स्पायडरमॅनच्या वेशातच करताना दिसतो. फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमॅन असे ही तो इतरांना मदत करते वेळी बोलतो. ऑफिसमध्ये येणाऱ्या इतर लोकांना ते अगदी विचित्र वाटते मात्र शेवटचा दिवस अशा प्रकारे गाजवणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या स्टाइलची सर्वीकडे कौतुक होते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -