घरमुंबई'हेच का अच्छे दिन' शिवसेनेची भाजपविरोधात पोस्टरबाजी

‘हेच का अच्छे दिन’ शिवसेनेची भाजपविरोधात पोस्टरबाजी

Subscribe

वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून शिवसेनेची भाजप सरकारविरोधात पोस्टरबाजी. दादर परिसरात शिवसेना भवन जवळ शिवसेनेने सरकारचे हेच का अच्छे दिन असं म्हणत पोस्टर्स लावली आहेत.

पेट्रोल-डिझेलची वारंवार होणाऱ्या दर वाढिमुळे जनता त्रस्त झाली आहेत. त्यामध्ये आता पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेने देखील पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीविरोधात पोस्टरबाजी करत भाजपवर जोरदार टीका केलीये. दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये शिवेसेने पोस्टर लावून भाजप सरकारला हेच का ‘अच्छे दिन’ असा सवाल केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेची पोस्टरबाजी

शिवसेनेने मुंबईच्या अनेक भागामध्ये भाजपविरोधात पोस्टर लावले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये २०१५ पासून ते २०१८ पर्यंत इंधनाच्या किंमतींचा आकडा देण्यात आला आहे. या इंधनाच्या किंमतीमध्ये या तीन वर्षात झालेल्या दर वाढीवरुन शिवेसेनेने भाजपला हेच का अच्छे दिन असा सवाल केला आहे.

सलग १५ व्या दिवशी दर वाढ

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या १५ दिवसापासून सतत पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात १२ पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये ११ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमधील पेट्रोलचा आजचा दर ८७.८९ प्रतिलिटर तर डिझेल ७७.०९ प्रतिलिटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आणखी फटका बसला आहे.

- Advertisement -

राजधानीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

दिल्लीमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल १० पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. त्यामुळे आजचा पेट्रोलचा दर ८०.५० रुपये आणि डिझेलचा दर ७२.६१ रु. प्रतिलिटर आहे. शनिवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली होती आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी वाढ झाल्यामुळे जनता संतप्त झाली आहे. सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्य दरामध्ये वाढ सुरू आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -