घरताज्या घडामोडीचीन भारतासह या देशात पाठवतोय घातक रसायनांचे कोटींग असलेली खेळणी

चीन भारतासह या देशात पाठवतोय घातक रसायनांचे कोटींग असलेली खेळणी

Subscribe

संपूर्ण जगाला कोरोनाच्या खाईत ढकलणाऱ्या चीनचा भयानक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. चीन घातक विषारी रसायनांचा मुलामा असलेली खेळणी भारतासह अनेक देशात पाठवत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असून शुक्रवारी अमेरिकेने केलेल्या कारवाईत ही धक्कादायक माहिती समोर आली

विशेष म्हणजे या खेळण्यांमध्ये शीशे, कॅडमियम,बेरियमचा अतिरिक्त वापर करण्यात येत आहे. ज्यामुळे लहान मुले किंवा खेळणी हाताळणाऱ्या व्यक्तींच्या स्पर्शाद्वारे घातक पदार्थ शऱीरात प्रवेश करू शकेल. १६ जुलैपासून अमेरिकेने या खेळण्यांची तपासणी सुरू केली होती. त्यानंतर ही खेळणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल नुकताच समोर आला असून यात या खेळण्यांवर घातक रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेले कोटींग असल्याचे समोर आले. अमेरिकेने या घातक खेळणी असलेले सहा बॉक्स जप्त केले आहेत. यात २९५ पॅकेट “लगोरी ७ स्टोन “ ही खेळणीही आहेत. सध्या भारतात या गेमचा ट्रेंड असून याला पिठ्टू असेही म्हटले जाते. यामुळे ऑनलाईन खेळणी घेताना सावध राहण्याचा इशारा अमेरिकेने नागरिकांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -