घरदेश-विदेश'जी-७' शिखर परिषदेमुळे चीन अस्वस्थ? म्हणतोय, काही देश एकत्र येऊन जगावर राज्य...

‘जी-७’ शिखर परिषदेमुळे चीन अस्वस्थ? म्हणतोय, काही देश एकत्र येऊन जगावर राज्य करु शकत नाही.

Subscribe

कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेची निर्मिती

यंदा इंग्लंडच्या कार्बिसमध्ये जगातील सर्वात बड्या अर्थव्यवस्था असलेल्या सात देशांच्या होणाऱ्या ‘जी-७’ शिखर परिषदेमुळे चीन अवस्थ झाला आहे. या परिषदेवरून चीन गेल्या काही दिवसापासून सहभागी देशांवर आरोप करत धमक्या देत आहे. अस्वस्थ झालेल्या चीनने आता ते दिवस संपले जेव्हा काही देश एकत्र येत पूर्ण जगावर सत्ता करत होते असे विधान केले आहे. तर चीनकडून असेही सांगण्यात आले आहे की, काही देश एकत्र जगावर राज्य करू शकत नाहीत.

जी-7 देशांना धमकावतोय चीन

ब्रिटनमधील चीन दूतावासातून जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणताही देश छोटा असो वा मोठा, श्रीमंत किंवा गरीब, बलवान किंवा दुर्बल, जगातील प्रत्येक मुद्दांवर प्रत्येक देशांशी चर्चा करुन निर्णय घेतला पाहिजे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार चीन देश आहे.

- Advertisement -

जी-७ परिषदेत सहभागी देशांवर चिडला चीन

जी-७ परिषदेत चीन यासाठी चिडला आहे कारण, चीनमध्ये भविष्यात कोरोना संसर्गाचा पुन्हा संशोधन करण्याच्या जी-७ देशांच्या मागणीला चीनला होकार घ्यावा लागला. यावर जी-७ देशांची मागणी आहे की, कोरोना विषाणुच्या उत्पत्तीची तपासणी पुन्हा झाली पाहिजे आणि चीनचा याचा पूर्ण पाठिंबा मिळाला पाहिजे. या जी-७ बैठकीत चीनला असे आवाहन करण्यात आले आहे की, चीनने हाँगकाँग आणि शियजियांगमधील आपल्या कारवाया थांबवत आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा आदर करावा. तसेच याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मुक्तपणे जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. कारण हा या नागरिकांचा हक्क आहे.

चीनवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न 

यावर्षी जी-७ परिषदेत असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले ज्याचा थेट आणि अप्रत्यक्ष संबंध कुठेतरी चीनशी जोडलेला होता. या सर्व मुद्द्यांवर जी-७ सदस्य देशांनी चीनविरोधात एकजुट निर्माण करण्याचे आव्हान केले आहे. परंतु यात या देशांनी कुठेही चीनचे प्रत्यक्ष नाव घेतले नाही. या परिषदेच्या नियमांनुसार, हिंद-प्रशांत प्रदेशातील सर्व मुक्त हालचालीना सुनिश्चित करण्यासही सहमती दिली आहे.

- Advertisement -

चीनच्या डरकाळ्या 

चीनकडून असे म्हटले जात आहे की, चीन नेहमीच जागतिक शांतता आणि स्थिरतेच्या बाजूने राहिला आहे. असे असूनही, जर कोणी पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील परिस्थिती आणि त्याचे वास्तव बदलण्याचा प्रयत्न केला किंवा या प्रदेशात अशांतता आणि स्थिरता निर्माण केल्यास चीन गप्प बसणार नाही. विशेष म्हणजे चीनने बर्‍याच वेळा दक्षिण चीन समुद्र आणि तैवान देशाविरोधात आक्रमकता दर्शविली आहे. या भागांतून अनेकदा अमेरिकन युद्धनौका बाहेर आल्या आहेत.

चीनने कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत जाण्यास परवानगी द्या, अमेरिकेची मागणी 

अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चीनने कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी पूर्ण सूट दिली नाही. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनच्या या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे. चीनने आपल्या प्रयोगशाळेत कोणत्याही प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे, तर अमेरिकेची इच्छा आहे की, चीनच्या प्रयोगशाळेतून तपासकांना नमुने घेण्यास परवानगी द्यावी. तरच ही चौकशी योग्य असल्याचे जाहीर केले जाऊ शकते.

कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेची निर्मिती

यापूर्वीही बायडेन यांनी सांगितले आहे की, कोरोना हा प्राणघातक विषाणू कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यापासून मनुष्यापर्यंत आला आहे हे मान्य करण्यास अद्याप आम्ही तयार नाही. कारण हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेची निर्मिती आहे. या जी -7 परिषदेत चीनच्या बेल्ट रोड उपक्रमाला प्रतिसाद म्हणून बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड (बी 3 डब्ल्यू) ची योजना पुढे ठेवली गेली आहे. चीनची ही योजना केवळ जगातील देशांच्या प्रगतीसाठीच नाही तर ती आपल्या लोकशाही मूल्यांनाही प्रतिबिंबित करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.


Coronavirus : कोरोना विषाणुवर डायबिटीजचे औषध ठरु शकते गुणकारी, संशोधन सुरु


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -