घरदेश-विदेशफेक कॉल्स आणि मेसेजपासून होणार नागरिकांची सुटका; ट्रायकडून नवीन फिल्टर येणार

फेक कॉल्स आणि मेसेजपासून होणार नागरिकांची सुटका; ट्रायकडून नवीन फिल्टर येणार

Subscribe

नवी दिल्ली : फेक कॉल्स आणि मेसेजमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फेक कॉल्स आणि मेसेज ब्लॉक केल्यानंतरही वेगवेगळ्या नंबरवरून वापरकर्त्यांना सतत फोन येत असतात. परंतु आता या फेक कॉल्स आणि मेसेजपासून नागरिकांची सुटका होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) द्वारे येत्या 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू होणार आहे. (Citizens will be freed from fake calls and messages)

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्पॅम फिल्टर्स लागू होणार
ट्रायने एका फिल्टरची व्यवस्था केली आहे. यामुळे नागरिकांना येत्या 1 मे पासून फोनमध्ये फेक कॉल्स आणि मेसेज येणार नाहीत. या संदर्भात ट्रायने दूरसंचार कंपन्यांना आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना येत्या १ मे पासून फोन कॉल्स आणि मेसेजसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्पॅम फिल्टर्स लागू करावे लागणार आहे. या फिल्टरमुळे वापरकर्त्यापर्यंत फेक कॉल्स आणि मेसेज पोहचू शकणार नाही आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलने AI फिल्टर लागू करण्याची सुविधा सुरू केली असून पुढील काही महिन्यांत जिओद्वारे हे फिल्टर सुरू केले जाऊ शकते. त्यामुळे येत्या 1 मे पासून भारतात AI फिल्टर्सची सुविधा सुरू होईल असे मानले जात आहे.

- Advertisement -

कॉलर आयडी फीचरवर काम सुरू
फेक कॉल्स आणि मेसेज बंद करण्यासाठी ट्रायकडून बऱ्याच दिवसांपासून एक नियम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत ट्रायने 10 अंकी मोबाईल नंबरवरून प्रमोशन कॉल्सवर बंदी घालण्याची टेलिकॉम कंपन्यांकडे मागणी केली आहे. यासोबतच कॉलर आयडी फीचर सादर करण्यावर ट्रायकडून काम सुरू आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर फोन आल्यावर वापरकर्त्यांला कॉल करणाऱ्याचा फोटो आणि नाव दिसणार आहे. या संदर्भात टेलिकॉम कंपनी Airtel आणि Jio च्या Truecaller ऍपशीही ट्रायची चर्चा सुरू आहे. पण टेलिकॉम कंपन्यांनाकडून वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीबाबत चिंता आहे. त्यामुळे ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून ट्रायला परावृत्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -