घरदेश-विदेशSunita Kejriwal : सुनीता केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत...

Sunita Kejriwal : सुनीता केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत टीका

Subscribe

मुख्यमंत्री केजरीवाल आणि दिल्लीकर जनता यांच्यातील दुवा म्हणून ‘आप’चे नेते नव्हे तर सुनीता केजरीवाल सक्रिय झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे आता सुनीता केजरीवाल यांच्याकडे स्वतः मुख्यमंत्री केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी दिल्लीचा कारभार हा तुरुंगातून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुनीता केजरीवाल यांना संदेश देत असून, तो संदेश सुनीता लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे केजरीवाल आणि दिल्लीकर जनता यांच्यातील दुवा म्हणून ‘आप’चे नेते नव्हे तर सुनीता केजरीवाल सक्रिय झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे आता सुनीता केजरीवाल यांच्याकडे स्वतः मुख्यमंत्री केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्याची शक्यता आहे. (CM Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal is likely to get post of Chief Minister)

हेही वाचा… Congress : पुन्हा हे करण्याची हिंमत होणार नाही, ही माझी गॅरंटी; राहुल गांधींचा भाजपाला इशारा

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे फारच थोडावेळ उरला आहे, असे सूचक विधान केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी काल शुक्रवारी (ता. 29 मार्च) केले. त्यामुळे ‘आप’ला मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता दिसू लागली आहे. परंतु, सध्या तरी मुख्यमंत्री केजरीवाल हे ईडीच्या कोठडीतून आपला कारभार सांभाळत आहेत. पण यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांची मोलाची साथ लाभली आहे. केजरीवाल तुरुंगात राहिले तरी तेच मुख्यमंत्री राहतील अशी ‘आप’ची अधिकृत भूमिका असली तरी, केजरीवालांचे संदेश मात्र त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल दिल्लीकरांपर्यंत पोहोचवत आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल हे तुरुंगात जाताच सुनीता केजरीवाल या राजकारणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेळ पडली तर केजरीवाल सुनीता केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करू शकतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर सुनीता यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली आहे. केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात त्यांनी ठोस भूमिका घेत भाजपावर टीकास्त्र देखील डागले आहे.

- Advertisement -

काल शुक्रवारीही सुनीता यांनी X या सोशल मीडिया साइटवरून जनतेला उद्देशून चित्रफीत प्रसारित केली असून केजरीवाल यांच्यासाठी संदेश पाठवून त्यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी ‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहिमेची घोषणा सुनीता यांच्याकडून करण्यात आली. याकरिता सुनीता यांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुनीता केजरीवाल माजी भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी असून त्यांनी 22 वर्षे प्राप्तिकर विभागात काम केले आहे. भोपाळमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान तिची अरविंद केजरीवाल यांच्याशी भेट झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -