घरदेश-विदेशThackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची...

Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : देशातील सगळ्यात महागडे वकील हरीश साळवे यांच्यासह 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. वकिलांचे पत्र हा एक फार्स आहे आणि त्याचे सूत्रधार दुसरेच आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी प्रेरणेने सुरू झालेला हा खेळ आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Sunita Kejriwal : सुनीता केजरावालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत टीका

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणारे सर्व वकील एका विशिष्ट विचारसरणीचे आणि सध्याच्या वादग्रस्त राज्यव्यवस्थेचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे आहेत, हे त्यांच्या पत्रावरून स्पष्ट दिसते. 600 वकिलांचा ‘संघ’ त्यांच्या पत्रात म्हणतो की, न्यायपालिका मूठभर लोकांच्याच हाती आहे. काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

वकिलांचा ‘संघ’ पत्रात पुढे म्हणतो ते महत्त्वाचे. पत्रात म्हटले आहे की, ‘नेते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हेतुपुरस्सर न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. राजकीय आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे न्यायालयाला धमकावले जात आहे. वकिलांच्या पत्राची लगेच दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ‘घाबरविणे आणि धमक्या देणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Naik VS Govinda : अभिनेता गोविंदावर केलेल्या आरोपावर आपण ठाम – राम नाईक 

वकिलांचा हा संघ देशाच्या न्यायव्यवस्थेवर लोकशाही आणि संविधानावर हल्ला होत असताना एखादे खरमरीत पत्र पंतप्रधान मोदींना का लिहीत नाही? मणिपुरातील हिंसाचारात लोकशाही व राज्यघटनेचे धिंडवडेच निघाले. महिलांची रस्त्यावर नग्न धिंड काढली. त्यामुळे 600 वकिलांचा ‘संघ’ अस्वस्थ झाला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन मोदी सरकारने निर्दयपणे चिरडले. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. यावरही वकिलांचा ‘संघ’ चिंता व्यक्त करताना दिसला नाही, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -