घरताज्या घडामोडीCoal and Power Crisis : कोळसा संकटामुळे देशातील अनेक राज्यं अंधारात जाण्याची...

Coal and Power Crisis : कोळसा संकटामुळे देशातील अनेक राज्यं अंधारात जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातही लोडशेडिंग

Subscribe

भारतातील कोळसा संकट अद्याप टळलं नाही. यंदा कोळसा खाणींतील उत्पादन मागील 9 वर्षांच्या तुलनेत सगळ्यात खालच्या पातळीवर होत आहे. तर दुसरीकडे गर्मी वाढत असल्यामुळे देशातील प्रमुख राज्यांमध्ये वीजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर उद्योगांनी आपले उत्पादन वाढवले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी होत आहे. महाराष्ट्रातही कोळशाचे संकट उद्भवले आहे. देशात कोळसा संकटामुळे अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे.

देशात सुरु असलेल्या कोळसा संकटात मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज खंडित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील सर्वात मोठं औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातही सक्तीची वीज कपात लागू करण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे टाळता येण्यासाठी गुजरात आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी त्यांच्या ऊर्जा कंपन्यांना इतर राज्यांकडून महागड्या किमतीत वीज खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. मागणीच्या तुलनेत वीज पुरवठ्यात 1.4% ची कमतरता आहे. हे नोव्हेंबर-2021 मधील 1% पेक्षा जास्त आहे. देशाला कोळशाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला होता, जो देशातील ऊर्जा उत्पादनाचा मुख्य स्त्रोत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात वीजेचा तुटवडा

वाढत्या गर्मीमुळे महाराष्ट्रातील वीजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. याचा भार आता वीज कंपन्यांवर पडला आहे. राज्यात वीजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये 2,500 मेगावॅटचे अंतर आहे. यानंतर राज्य वीज वितरण कंपनी ग्रामीण आणि शहरी भागात सक्तीची वीज कपात लागू करत आहे. महाराष्ट्रात सध्या 28,000 मेगावॅट विजेची मागणी आहे. तर गेल्यावर्षी याच काळात चार हजार मेगावॅटची मागणी होती. यानंतर वीज कपातीचा आराखडा राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वीज कपात सुरु करण्यात येईल.

आंध्र प्रदेशात उद्योगांना फक्त 50% वीज

महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशची स्थिती आहे. तिकडेही वीजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यामध्ये 8.7 ची कमतरता आहे. तर झारखंड, बिहार, हरियाणा, उत्तराखंडमध्ये ३ टक्क्यांची कमतरता आहे. आंध्र प्रदेशात उद्योगांना 50 टक्के वीज मिळाली आहे. राज्यातील अनेक भागात अनेक तास वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे संतप्त झालेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Video Viral: पाकव्याप्त काश्मीरमधील सामूहिक बलात्कार पीडितेची पंतप्रधान मोदींकडे मदतीची हाक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -