घरCORONA UPDATECorona: काँग्रेस प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले देशाला संबोधित

Corona: काँग्रेस प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले देशाला संबोधित

Subscribe

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळीच एक व्हिडिओ जारी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळीच एक व्हिडिओ जारी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लॉकडाऊनचा कालावधीत संपत असल्याने सकाळी १० वाजता नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. मात्र त्या आधीच सोनिया गांधी यांनी व्हिडिओ जारी करून आपले मत व्यक्त केले आहे. कोरोनाचे संकट देशावर ओढवले असताना त्यांनी सध्या अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेत असो वा आताच्या परिस्थितीत विरोधी पक्षात, अशा कठिण प्रसंगी कायम देशातील जनतेसोबत असल्याचेही त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – Corona: काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; संपूर्ण देशाचे लागले लक्ष

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -