घरCORONA UPDATECorona: काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; संपूर्ण देशाचे लागले लक्ष

Corona: काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; संपूर्ण देशाचे लागले लक्ष

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याचा कालावधी आज संपत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याचा कालावधी आज संपत आहे. त्यामुळे देश आता कोणत्या दिशेने जाणार याचे संकेत मोदींच्या भाषणातून नागरिकांना मिळणार आहेत. या २१ दिवसांच्या काळात देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी देश तसेच राज्य पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवणार, काही गोष्टींवरील निर्बंध शिथिल करणार, लॉकडाऊन संपवणार या सर्वच बाबींवर आज पंतप्रधानांचा निर्णय समजणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला या भाषणाची उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊच्या २१ दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला खरा. मात्र तो केवळ देशातील लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी होता. यामध्ये ५ एप्रिल रोजीचा लाईट मार्च हा उपक्रम उल्लेखनिय ठरला. मात्र आता देश एका वेगळ्या टप्प्यावर आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. उद्योद धंदे, कामकाज, व्यापार ठप्प झाले आहेत. रेल्वे गाड्या, विमान बंद ठेवली आहेत. या अनुषंगाने मोदी काही महत्त्वाची घोषणा करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच उद्योग व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत काही संकेत देतील का, याची आशा सर्वांना आहे. त्याशिवाय लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कामकाजांचा परिणाम गोरगरिबांवर झाला असून त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. अशामध्ये मोदी आर्थिक पॅकेज जाहीर करणार का, याचीही उत्सुकता लोकांना आहे. यापूर्वीच महाराष्ट्रासह ओडिशा, पंजाब, कर्नाटक, तेलंगण, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी खबरदारी म्हणून स्वत:हून लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.

हेही वाचा –

Corona: काँग्रेस प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले देशाला संबोधित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -