घरदेश-विदेशCongress : मतभेद विसरून एकत्र यावे लागेल, खर्गे यांचे पक्षनेत्यांना आवाहन

Congress : मतभेद विसरून एकत्र यावे लागेल, खर्गे यांचे पक्षनेत्यांना आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मतभेद विसरून एकत्र यावे लागेल, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. तसेच, पक्षातील अंतर्गत वाद सार्वजनिक करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा – NCP Split: ‘अजितदादांनी केलेली गद्दारी जनतेला पटली नाही, योग्य वेळी…’; अनिल देशमुखांची टीका

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल, गुरुवारी खासदार राहुल गांधी, पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रभारी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यांतील काँग्रेस विधानसभा पक्षनेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षातील आपले अपयश लपवण्यासाठी भाजपा आता भावनिक मुद्दे उपस्थित करत आहे. प्रत्येक मुद्द्यावर ते काँग्रेसला मुद्दाम गोवतात. जनतेसमोर तळागाळातील प्रश्नांवर भाजपाच्या खोटेपणा, फसवेगिरी आणि चुकीच्या कृत्यांना आपण संघटित होऊन चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आपापसातील मतभेद प्रसार माध्यमांसमोर न मांडता ते दूर करण्याचे प्रयत्न करावेत आणि एक टीम म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांना केले. रात्रंदिवस मेहनत केली तर, 2024च्या लोकसभा निवडणुकीत पर्यायी सक्षम सरकार आपल्याला देता येईल. जिथे आपण कमकुवत आहोत, अशा जागा लक्षात घेऊन तिथे लोकाप्रिय उमेदवार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. तुम्ही सर्व पक्षाचे डोळे आणि कान आहात, असे सांगून ते म्हणाले, आपल्याला जे काही करायचे आहे, ते करण्यासाठी आपल्याकडे फक्त पुढील तीन महिने आहेत, त्यात आपल्याला पक्षासाठी सर्व शक्तीनिशी रात्रंदिवस काम करायचे आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच.

हेही वाचा – Adani : सत्य जिंकले की सत्यालाही…, ठाकरे गटाचा भाजपावर घणाघात

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, जाहीरनामा आणि जागावाटपावर चर्चा सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, ज्या जिंकण्याची शक्यता असलेल्या लोकसभेच्या निम्म्या जागांवर पूर्ण ताकद लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला. निम्म्याहून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा विचार आहे.

हेही वाचा – Amol Kolhe : पितृतुल्य गुरूंना निवृत्त होण्याचा सल्ला दिला जातो त्यांना श्रीराम कसे पावतील – अमोल कोल्हे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -