घरमहाराष्ट्रपुणेPune News: नाट्य संमेलनाला काका-पुतण्या एकाच मंचावर? दादा म्हणतात, माझं नाव...

Pune News: नाट्य संमेलनाला काका-पुतण्या एकाच मंचावर? दादा म्हणतात, माझं नाव…

Subscribe

पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतण्या उपस्थित राहणार, अशा चर्चा होत्या. परंतु, याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट नकार दिला. माझं नाव कुठेही टाकतात,असं म्हणत त्यांनी आपल्याला निमंत्रण नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुणे: पुण्यात आजपासून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरूवात होत आहे. त्याच्या नाट्य दिंडीलाही सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवरांच्या यादीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही नावं असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मंचावर काका-पुतण्या एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु अजित पवारांना याविषयी विचारलं असता त्यांनी आश्चर्य व्यक्त करत, नाही नाही.. माझं नाव कुठेही टाकतात, असं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Pune News Sharad Pawar Ajit pawar on the same stage at Marathi Natya Sammelan Ajit Dada denied it)

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

माझं नाव कुठेही टाकतात-अजित पवार

पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतण्या उपस्थित राहणार, अशा चर्चा होत्या. परंतु, याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट नकार दिला. माझं नाव कुठेही टाकतात,असं म्हणत त्यांनी आपल्याला निमंत्रण नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

तब्बल 25 वर्षानंतर शहरात नाट्यसंमेलन होणार आहे. याआधी 79 वे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पडली होती. यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.

- Advertisement -

असं असेल नाट्यसंमेलन?

  • 5 जानेवारी 2024- पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
  • 6 जानेवारी 2024- पिंपरी- चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
  • 7 जानेवारी 2024- विविध कार्यक्रमांचे आयोजन ( महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)

(हेही वाचा NCP Split: ‘अजितदादांनी केलेली गद्दारी जनतेला पटली नाही, योग्य वेळी…’; अनिल देशमुखांची टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -