घरदेश-विदेशऑटोमोबाईल क्षेत्रालाही कोरोनाचा फटका! गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत ३९ टक्के तोटा

ऑटोमोबाईल क्षेत्रालाही कोरोनाचा फटका! गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत ३९ टक्के तोटा

Subscribe

देशात कोरोनाचा कहर गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. कोरोनाच्या प्रादु्र्भावाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. कोरोना महामारीमुळे व्यापार, उद्योग धंदे यांना मोठा फटका बसला. ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या आर्थिक वर्षात भारताकडून वाहनांच्या निर्यातीत ३९ टक्क्यांनी घट झाली असल्याचे समोर आले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ६ लाख ६२ हजार ११८ वाहनांची निर्यात करण्यात आली होती. परंतु २०२०-२०२१ या वर्षात या आकड्यात घट झाली असून ४ लाख ४ हजार ४०० इतकी आहे. तर ही घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना महामारी. यामुळे प्रवासी वाहनांच्या निर्यातीत एकूण ३८.९२ टक्के घट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ४ लाख ७५ हजार ८०१ कारची निर्यात केली होती. तर २०२०-२०२१ या वर्षात ही निर्यात कमी होऊन २ लाख ६४ हजार ९२७ इतकी झाली आहे. यानुसार कार निर्यातीच्या महसुलात ४४.३२ टक्के घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युटिलिटी वाहनांच्या क्षेत्रात झालेल्या महसुलात २४.८८ टक्क्यांची घट झाली आहे. भारतातून निर्यात केलेल्या वाहनांच्या बाबतीत, गेल्या वर्षी म्हणजेच २०१९-२० दरम्यान, २ हजार ८४९ युनिट्सच्या तुलनेत केवळ १ हजार ६४८ युनिट्सची निर्यात झाली होती, म्हणजेच येथे महसुलात ४२. १६टक्के घट झाली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

यासह आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला, तेव्हा रेल्वे आणि हवाई प्रवासावरील अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. असे असले तरी आर्थिक वर्षाच्या अखेरीस निर्यातील वाढ करण्याचे काम ऑटोमोबाईल उद्योगाने केले असले तरी, त्या वर्षातील एकूण निर्यात आकडेवारी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र सध्या चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचे त्याचे परिणाम अधिक चिंताजनक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -