घरदेश-विदेशकोरोनाग्रस्त महिलेला करवा चौथचे व्रत करण्यास केली मनाई; इमारतीवरून घेतली उडी

कोरोनाग्रस्त महिलेला करवा चौथचे व्रत करण्यास केली मनाई; इमारतीवरून घेतली उडी

Subscribe

करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केल्याने महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

देशभरात बुधवारी करवा चौथचा उपवास अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसह महिलांनी केला. मात्र यादिवशी कोरोनाची लागण झालेल्या महिलेला करवा चौथचा उपवास करण्यास मनाई केल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला आहे. करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केल्याने महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापाठामध्ये ही घटना घडली. महिलेची कोरोना झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेने टोकाचं पाऊल उचललं.

असा घडला प्रकार

मृत्यू झालेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिला करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे उपवास करण्यास मनाई केल्याने या महिलेला उपवास करता आला नाही. म्हणून या महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

- Advertisement -

मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिला २७ ऑक्टोबरला महिलांच्या न्यूरो-सर्जरी विभागात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २९ ऑक्टोबरला तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तेव्हा तिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्ड मध्ये हलविण्यात आले होते. तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.


बायको करत होती करवा चौथची तयारी आणि नवऱ्याने घेतला गळफास!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -