घरCORONA UPDATEलसीमुळे कोरोनासह 'या' 20 आजारांपासून राहता येते दूर; WHO ची माहिती

लसीमुळे कोरोनासह ‘या’ 20 आजारांपासून राहता येते दूर; WHO ची माहिती

Subscribe

जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यात आता ओमिक्रॉन आणि इतर नव्या व्हेरिएंटने चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये इतर आजारांविषयीही भीती निर्माण झाली आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने या चिंताजनक वातावरणात दिलासाजनक बातमी दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. पण या लसीमुळे फक्त कोरोना आजाराचं नाही तर इतर 20 आजारांपासून दूर राहण्यास मदत होत आहे. ही कोरोनाविरोधी लस 20 विविध आजारांवर गुणकारी ठरत आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

या कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत लाखो नागरिकांचा जीव गेला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पण कोरोनाविरोधी लसीकरणामुळे आता मृत्यूदर रोखण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लस हेच शस्त्र असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञ देखील सांगतात. मात्र आता ही लस 20 आजारांवर फायदेशीर ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना एक दिलासा मिळत आहे. जाणून घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणामुळे कोणत्या 20 आजारांपासून संरक्षण मिळते याची यादी

- Advertisement -

1. कोव्हिड-19 (Covid-19)
2. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
3. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
4. पोलिओ (Polio)
5. पटकी/कॉलरा (Cholera)
6. घटसर्प (Diphtheria)
7. कांजण्या (Varicella)
8. पीतज्वर (Yellow Fever)
9. इबोला (Ebola)
10. हेप बी (Hep B)
11. इन्फ्लुएंझा (Influenza)
12. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
13. गोवर (Measles)
14. मेंदुज्वर (Meningitis)
15. गालगुंड (Mumps)
16. डांग्या खोकला (Pertussis)
17. रेबिज (Rabies)
18. रोटा व्हायरस (Rotavirus)
19. गोवर (Rubella)
20. धनुर्वात (Tetanus)
21. विषमज्वर (Typhoid)

- Advertisement -

India Corona Update: देशात आज कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा कमी, 959 रुग्णांचा मृत्यू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -