घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus:...अन् असा पसरला अमेरिकेत कोरोना

Coronavirus:…अन् असा पसरला अमेरिकेत कोरोना

Subscribe

सीडीसीने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरवणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या शिकागो शहरात एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात हजेरी लावली आणि तेथील लोकांसह जेवण केलं. काही दिवसांनंतर, तो माणूस वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता जिथे त्याने घरातील इतर सदस्यांना मिठी मारली. काही दिवसांनंतर या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली. ही व्यक्ती अमेरिकेच्या शिकागो शहरातील आहे. या व्यक्तीमुळे नकळत १५ लोकांना संसर्ग झाला. त्यातील तीन लोक मरण पावले. ही घटना फेब्रुवारी महिन्यातील आहे जेव्हा अमेरिकेत सामाजिक अंतर बाळगण्याचा आदेश लागू केला नव्हता. सीडीसीने (रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की या व्यक्तीने संसर्ग पसरविण्याची श्रृंखला सुरू केली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी आणि पार्टीच्या वेळी या व्यक्तीस श्वासोच्छवासाच्या काही समस्या होत्या. या अहवालात विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरवणाऱ्या या व्यक्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. मित्र आणि नातेवाईकांद्वारेही कोविड -१९ व्यापक स्तरावर कसा पसरू शकतो हेही या अहवालात सांगितलं आहे.

शिकागोमध्ये हे सर्व रूग्ण एकमेकांच्या संपर्कात आले. ५ ते ८६ वयोगटातील हे लोक होते. ते सर्वजण अंत्यसंस्कार, वाढदिवस पार्टी आणि चर्चमध्ये एकमेकांना भेटले. या अहवालानुसार मृत्यू झालेल्या तिन्ही रूग्णांचे वय अंदाजे ६० वर्षांवरील होते. तिघांनाही हृदय व श्वसनाचे आजार होते. सीडीसीने म्हटलं आहे की सामाजिक अंतर राखणं किती गरजेचं आहे हे यातून दिसून येतं. कुटुंबातील सदस्यांसोबत देखील अंतर राखणं गरजेचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीच्या बंगाली बाजारात आढळले कोरोनाचे ३ रुग्ण; बंगाली बाजार केला सील


या अहवालात शिकागोमधील व्यक्तीला संसर्गाचा स्त्रोत असं वर्णन केलं आहे. अंत्यसंस्कारासाठी गेलेली व्यक्ती त्यांच्या कुटुंबाचा जवळचा मित्र होता. अडीच तासाच्या अंत्यसंस्कारात ही व्यक्ती बर्‍याच लोकांना भेटली आणि त्यांच्याबरोबर जेवणही केले. त्या व्यक्तीने त्या घराच्या चार सदस्यांना मिठी मारून शोक व्यक्त केला. सहा दिवसांतच या चार जणांमध्ये कोविड -१९ची लक्षणं आढळली. यापैकी एकाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एक सदस्य रुग्णालयात या व्यक्तीस भेटण्यासाठी आला. या सदस्याने कोणतीही संरक्षणात्मक उपकरणं न घालता कोविड -१९ संक्रमित नातेवाईकाची काळजी घेतली. तीन दिवसांत या व्यक्तीला ताप आणि कफसह कोरोना विषाणूची लक्षणं देखील दिसू लागली.

- Advertisement -

संसर्ग पसरवणारा पहिला व्यक्ती अंत्यसंस्कारानंतर वाढदिवसाच्या पार्टीला गेला आणि तिथे त्याने अनेक पाहुण्यांना मिठी मारली व त्यांच्याबरोबर जेवायला बसला. एका आठवड्यातच यापैकी सात जणांना कोविड -१९ ची लक्षणे दिसू लागली. त्यातील पाच जणांना कफ आणि ताप आला. तर दोन जणांना यांत्रिक व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तेथे त्यांचा मृत्यू झाला. वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी तीन लोक कोविड -१९ ची लक्षणं दिसण्यापूर्वी चर्चमध्ये गेले होते. तिथे ९० मिनिटं थांबले. काही दिवसांनंतर, चर्चमध्ये आलेल्या काही लोकांमध्ये कोविड -१९ची लक्षणं दिसली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -